सूचनाचे ऐकून लोकही डिप्रेशनमध्ये; सरता आठवडा गोमंतकीयांसाठी ठरला हृदय हेलावणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 08:18 AM2024-01-15T08:18:52+5:302024-01-15T08:20:00+5:30

ऐकणाऱ्यांना डिप्रेशनमध्ये टाकणारा हा प्रकार असल्याचेही अनेकांना वाटत आहे.

people are also depressed after listening to the suchana seth incident | सूचनाचे ऐकून लोकही डिप्रेशनमध्ये; सरता आठवडा गोमंतकीयांसाठी ठरला हृदय हेलावणारा

सूचनाचे ऐकून लोकही डिप्रेशनमध्ये; सरता आठवडा गोमंतकीयांसाठी ठरला हृदय हेलावणारा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : संपलेला आठवडा हा गोमंतकीयांसाठी अत्यंत दुर्दैवी गेला. कशीच पचनी पडू शकत नाही अशा जन्मदात्रीकडून कोवळ्या मुलाच्या खुनाच्या बातम्यामुळे संपूर्ण गोवा हेलावून गेला. असा प्रकार गोव्यात यापूर्वी कधी घडलाच नव्हता. ऐकणाऱ्यांना डिप्रेशनमध्ये टाकणारा हा प्रकार असल्याचेही अनेकांना वाटत आहे.

राज्यात दररोज उघडकीस येणाऱ्या गुन्हेगारीमुळे गोवा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनत चालल्याची शंका यावी असे अनेक प्रकार घडले होते. अल्पवयीनांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत गोव्यात सर्वाधिक असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालय संचालित क्राइम कंट्रोल ब्युरोच्या अहवालातही स्पष्ट करण्यात आले होते.

गोव्यात ड्रग्स बनविण्याच्या फॅक्टरीही छाप्यातून आढळल्या होत्या. तसेच गांजाचे उत्पादन करण्याचे प्रकार तर भरपूर आढळले होते. येथील मानवी तस्करीच्या रॅकेटची पाळेमुळे तर पश्चिम बंगालपर्यंत पोहोचल्याचे अनेक वेळा उघड झाले होते. परंतु जन्माला येऊन ४ अवघी चार वर्षे झालेल्या स्वतःच्याच गोंडस बाळाचा गळा स्वतःच्या हाताने आवळणारी माताही असू शकते, असे कधी पाहिले नव्हते.

बंगळूरहून गोव्यात आलेल्या सूचना सेठ नामक महिलेमुळे तेही क्रौर्य पहावे लागले. गोव्यात होणाऱ्या गुन्ह्यांत बिगर गोमंतकीय लोकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलिस महासंचालक डॉ. जसपाल सिंग हे वेळोवेळी सांगत आहेत. परंतु बिगर गोमंतकीय इतके भयानक गुन्हे करण्यासाठी गोव्यात येऊ शकतात, हेही पहिल्यांदाच गोमंतकीयांनी पाहिले आहे.

दरम्यान, सातत्याने गुन्हेगारींवर होत असलेल्या चर्चेमुळेही काहींनी त्या भीतीदायक वाटत असल्याचे म्हटले आहे. राज्यातील अशा वातावरणावर सरकारने वेळीच नियंत्रण आणण्यची मागणी केली जात आहे. शिवाय परराज्यातून येणाऱ्यांवर बारिक लक्ष ठेवावे अशीही मागणी केली आत आहे. अशा गुन्हेगारांना वेळीच शिक्षा करून वचक बसवावा. त्यामुळे असे गुन्हे घडणार नाहीत, असेही म्हटले आहे.

या विषयीच्या बातम्यांवर सोशल मीडियावर गोव्यातील लोकांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'अशा प्रकारच्याही माता असू शकतात का? इथे येऊन कशाला केले कांड? अधिक श्रीमंतीमुळेही बुद्धी भ्रष्ट होते अशा अनेक प्रतिक्रिया पडल्या आहेत. तसे ही बातमी ऐक- ल्यापासून डिप्रेशनमध्ये गेल्याचेही काहींनी म्हटले आहे.

 

Web Title: people are also depressed after listening to the suchana seth incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा