लोकांनी जवळून पाहिलीय माझी २५ वर्षांतील कामगिरी: श्रीपाद नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 08:56 AM2024-04-12T08:56:22+5:302024-04-12T08:57:30+5:30

जे आत्ताच आले, ते प्रश्न विचारतात?

people have closely seen my achievements in 25 years said shripad naik | लोकांनी जवळून पाहिलीय माझी २५ वर्षांतील कामगिरी: श्रीपाद नाईक

लोकांनी जवळून पाहिलीय माझी २५ वर्षांतील कामगिरी: श्रीपाद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभेसाठी मला तिकीट मिळाल्याने विरोधकांचा आत्मविश्वास डगमगला आहे. यातून ते केवळ लोकांची दिशाभूल करत आहेत. जे नुकतेच राजकारणात आले ते विचारतात की, मी गेल्या २५ वर्षांत काय केले? ते नुकतेच आल्याने त्यांना माहीतदेखील नसणार, हे मी समजू शकतो. आम्ही जी कामे २५ वर्षात केली ती लोकांनी पहिली आहेत, त्यामुळे लोकांची दिशाभूल करणे विरोधकांनी टाळावे, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तरीही टीका सुरू झाल्या आहेत. ताळगाव मतदारसंघाने आतापर्यंत बऱ्यापैकी विकास केला आहे. त्यांना आवश्यक गोष्टी खासदार असताना यापूर्वी मी दिल्या आहेत, यापुढे देखील जे आवश्यक आहे, ते त्यांना निश्चित मिळणार आहे, असे आश्वासन भाजपचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी दिले.

विकासकामे हाच प्रमुख मुद्दा

कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे काम केले पाहिजे. सरकारने केलेली विकासकामे हाच आमच्यासाठी या लढाईत प्रमुख अस्त्र असणार आहे. भाजप सरकारने केवळ समाजाचाच विकास केला नाही, तर लोकांचाही विकास केला आहे. हे लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. माझा देश, माझे राज्य, माझे गाव हीच भावना मनात ठेऊन मी देखील आतापर्यंत काम केले आहे, याच कामांमुळे मी आज मान वर करून लोकांकडे जात आहे, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.

पंचसदस्य, नगरसेवकांशी संपर्क

श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी ताळगाव मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जेनिफर मोंसेरात, दामू नाईक, महापौर रोहित मोन्सेरात, जिल्हा पंचायत सदस्य अंजली नाईक व इतर पंच सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नाईक यांनी सर्व पंच सदस्य आणि नगरसेवकांशी वार्तालाप केला. व समस्या जाणून घेतल्या. मोन्सेरात कुटुंबीयांचा मला नेहमीच पाठिंबा मिळालेला आहे आणि यापुढेही त्यांचा पाठिंबा मिळणार आहे, याची मला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

 

Web Title: people have closely seen my achievements in 25 years said shripad naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.