थंडी ताप तपासण्यासाठी लोकांची आरोग्य केंद्रावर गर्दी ; डेंग्यूची भिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 02:57 PM2024-07-10T14:57:09+5:302024-07-10T14:57:54+5:30
पावसामुळे थंडी ताप वाढल्याने लाेक डेंग्यूच्या भितीने तपासणी साठी जात आहेत.
नारायण गावस
पणजी: राज्यात सध्या डेंग्यू मलेरियाचे रुग्ण मिळत असल्याने आरोग्य खाते सतर्क झाले आहे. तसेच आता पावसाळ्यात लाेकांना थंडी खाेकला सारखा आजार वाढल्याने अनेक लोक आराेग्य केंद्रावर तपासणीसाठी जात आहेत. पणजी आरोग्य केंद्रावर बुधवारी तपासणीसाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. पावसामुळे थंडी ताप वाढल्याने लाेक डेंग्यूच्या भितीने तपासणी साठी जात आहेत.
राज्यात पावसाळ्यात लहानापासून माेठ्यांना सर्वांना थंडी ताप सारखे आजार वाढतात. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात डेंग्यू मलेरिया सारखे आजार वाढत असतात. सध्या राज्यात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याने आराेग्य मंत्र्यांना आरोग्य खात्याला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आराेग्य खात्यातर्फे तपासणी सुरु आहे. लाेकांना थंडी खाेकला झाल्यावर आरोग्याची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अनेक लोक सरकारी तसेच खासगी रुग्णालयात डाॅक्टरांकडून थंडी ताप तपासणीसाठी करुन घेत आहेत.
आरोग्य खात्याकडून जनजागृती
राज्यात डेंग्यू मलेरिया तसेच थंडीचे आजारपसरु नये यासाठी जनजागृती केली आहे. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी लाेकांना पावसाळ्यात आराेग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात डेंग्यू मलेरियाचे प्रमाणे परराज्यात आता झिकाचे रुग्णही आढळत असल्याने त्या पाश्वभूमीवर आराेग्य खाते सतर्क झाले आहे. राज्यात लाेकांना असे आजार पसरु नये यासाठी ठिकठिकाणी पाहणी केली जात आहे. सतेच डेंग्यूच्या हॉटस्पॉटवर जागृती वाढविली आहे.
मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या आम्ही डेंग्यू मलेरियाविषयी सतर्कता व जगृती वाढविली आहे. तसेच लोकांना थंडी खाेकला या सारखे आजार अंगावर न काढण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे लाेकांनी आरोग्याची तपासणी करुन घेत आहे. आरोग्य खात्याचे कर्मचारी सर्व हॉटस्पाॅट ठिकाणावर नजर ठेऊन आहेत.