गोव्यात उद्धव ठाकरेंच्या विमानाला नाकारली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2016 05:21 PM2016-10-14T17:21:12+5:302016-10-14T17:21:12+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या शनिवारपासूनचा तीन दिवसांचा नियोजित गोवा दौरा लांबणीवर पडला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १४ - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या शनिवारपासूनचा तीन दिवसांचा नियोजित गोवा दौरा लांबणीवर पडला आहे. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांना खाजगी चार्टर विमान आणण्यास परवानगी न मिळाल्याने दौरा पुढे ढकलण्यात आला असून आता येत्या २२ रोजी ते गोव्यात येतील, असे शिवसेना राज्यप्रमुख सुदिप ताम्हणकर यांनी सांगितले.
२२ आणि २३ असे दोन दिवस उध्दव गोव्यात असतील, असे सांगण्यात आले. या भेटीत ते ठरल्याप्रमाणे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सुरक्षा मंच पक्षाशी जागावांटपाबाबत चर्चा करतील तसेच पर्वरी येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यातही मार्गदर्शन करतील. शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांशीही ते चर्चा करतील.