सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या वाहनांचे परमीट एका वर्षासाठी आता रद्द: मुख्यमंत्र्यांचा इशारा

By पूजा प्रभूगावकर | Published: July 19, 2024 03:16 PM2024-07-19T15:16:19+5:302024-07-19T15:16:37+5:30

काही कंत्राटदार हे ट्रक, रिक्शांमधून आणून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो.

Permits of vehicles dumping garbage in public places now canceled for one year: Chief Minister's warning | सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या वाहनांचे परमीट एका वर्षासाठी आता रद्द: मुख्यमंत्र्यांचा इशारा

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या वाहनांचे परमीट एका वर्षासाठी आता रद्द: मुख्यमंत्र्यांचा इशारा

पणजी: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळून येणाऱ्या वाहनांचे परमीट आता एका वर्षासाठी रद्द केले जाईल असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिला.

काही कंत्राटदार हे ट्रक, रिक्शांमधून आणून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो. या कंत्राटदारांची माहिती गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाला आहे का ? . जर असेल तर त्यांच्यावर कुठली कारवाई केली जाते असा प्रश्न सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी प्रश्नोत्तर तासात केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही वरील माहिती दिली.

आमदार बोरकर म्हणाले, की घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडून कचरा गोळा करण्याबाबत ॲप तयार केला आहे. मात्र प्रत्यक्षात हा ॲप कार्यरत तरी आहे का ? . महामंडळाचेच काही कंत्राटदार कचरा गोळा केल्यानंतर ते गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी आणून टाकतात. सरकार यावर कुठली कारवाई करते असा प्रश्न त्यांनी केला.

Web Title: Permits of vehicles dumping garbage in public places now canceled for one year: Chief Minister's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा