गोव्यातील स्पा सेंटरमधून देहविक्रीचा व्यवसाय? सरकारकडून कायदा दुरुस्तीचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 01:20 PM2018-03-30T13:20:55+5:302018-03-30T13:20:55+5:30

गोव्यातील काही स्पा सेंटरमधून वेश्या व्यवसाय चालतो, अशा प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर सरकारच्या आरोग्य खात्याने आता स्पांविरुद्ध कारवाई करण्याचा विचार पक्का केला आहे. येत्या आठवडय़ात वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी, महिला आयोगाच्या चेअरमन आदींची मिळून एक समिती नेमायची असे सरकारने ठरवले आहे.

 Physician business from Goa's spa center? The resolution of the law amendment by the government | गोव्यातील स्पा सेंटरमधून देहविक्रीचा व्यवसाय? सरकारकडून कायदा दुरुस्तीचा संकल्प

गोव्यातील स्पा सेंटरमधून देहविक्रीचा व्यवसाय? सरकारकडून कायदा दुरुस्तीचा संकल्प

Next

पणजी : गोव्यातील काही स्पा सेंटरमधून देहविक्रीचा व्यवसाय चालतो, अशा प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर सरकारच्या आरोग्य खात्याने आता स्पांविरुद्ध कारवाई करण्याचा विचार पक्का केला आहे. येत्या आठवडय़ात वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी, महिला आयोगाच्या चेअरमन आदींची मिळून एक समिती नेमायची असे सरकारने ठरवले आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य कायदा दुरुस्त करून स्पांविरुद्ध काही कडक तरतुदी करण्याचेही ठरले आहे.
गोव्यात गेल्या वीस वर्षात पर्यटन व्यवसायाचा विस्तार जसजसा होऊ लागला, तसतसे शेकडो स्पा गोव्यात सुरू झाले. उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत कळंगुट, कांदोळी, सिकेरी, बागा , वागातोर, हरमल, हणजुण येथे तर सर्वाधिक स्पा आढळतात. या शिवाय पर्वरी, साळगाव, पणजी, कांपाल, करंजाळे, मिरामार, दोनापावल, बांबोळी या पट्टय़ातही गेल्या पाच वर्षात अनेक स्पा सुरू झाले. दक्षिण गोव्यातील काणकोण, सासष्टी या तालुक्याच्या किनारी भागातही शेकडो स्पा दिसून येतात. गोव्याती बहुतांश तारांकित हॉटेलातही स्पा आहेत. या स्पांमध्ये पर्यटक आणि स्थानिकही जातात.
गोव्यातील स्पा मध्ये काम करणा:या अनेक मुली ह्या नेपाळी, आसाम वगैरे भागातील असतात. 9क् टक्के मनुष्यबळ हे परप्रांतीयच असते. गेल्या दोन वर्षात तर कळंगुट, हणजुणो, पर्वरी, पणजी आदी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील काही स्पांवर पोलिसांनी छापे टाकले. शरीर विक्रीचा धंदा ज्या स्पांमधून चालतो, अशा ठिकाणी कारवाई करण्यात आली. काहीजणांना अटक झाली तर काही मुलींची सुटका झाली. काही प्रकरणी पोलिसांची कारवाई देखील संशयाचा विषय ठरली. 
दरम्यान, आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणो यांनी अवघ्येच स्पा गैरधंद्यांमध्ये असतील, सगळे नव्हे असा मुद्दा येथे पत्रकार परिषदेत बोलताना मांडला. दोनापावल येथील स्पाविरुद्ध तक्रारी येत आहेत, असे ते म्हणाले. आम्हाला स्पा चालविणा:या व्यवसायिकांचा छळ करायचा नाही पण वेश्या व्यवसायासाठी स्पांचा वापर करणा:यांचा परवाना रद्द केला जाईल. तत्पूर्वी कारवाई एकतर्फी ठरू नये म्हणून आपण एक उच्चस्तरीय समिती नेमेन. पोलिस अधीक्षक चंदन चौधरी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि इतरांचा सहभाग ह्या समितीमध्ये असेल. या समितीकडून स्पांची पाहणी केली जाईल. सार्वजनिक आरोग्य कायदाही दुरुस्त करून काही नव्या तरतुदी केल्या जातील. सर्वच स्पांना आम्ही दोष देत नाही, असे मंत्री राणो म्हणाले.
 

Web Title:  Physician business from Goa's spa center? The resolution of the law amendment by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.