पंतप्रधान मोदी २६ रोजी गोव्यात; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 03:15 PM2023-10-06T15:15:42+5:302023-10-06T15:17:58+5:30

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना काही महिन्यांपूर्वीच निमंत्रण देण्यात आले होते.

pm narendra modi in goa on 26 to attendance at the opening ceremony of the national sports tournament | पंतप्रधान मोदी २६ रोजी गोव्यात; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती

पंतप्रधान मोदी २६ रोजी गोव्यात; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्यासह देशातील काही प्रमुख खेळाडूंची उपस्थिती असेल अशी माहिती क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना काही महिन्यांपूर्वीच निमंत्रण देण्यात आले होते. यापूर्वी २५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्याचे ठरविण्यात आले होते. तसा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. परंतु पंतप्रधानांच्या व्यस्त वेळापत्रकमुळे यात बदल करण्यात आला आहे. २५ ऐवजी २६ रोजी उद्घाटन सोहळा होईल. पंतप्रधान कार्यालयातून याबाबतचे पत्र दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारला मिळाले आहे, असे गावडे यांनी यावेळी सांगितले.

स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन २६ रोजी होणार असले तरी मुळात काही सामने १८ ऑक्टोबरपासून सुरू होतील. वेळेवर ही स्पर्धा संपू शकेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सर्व राज्यातील क्रीडा संघटनांचादेखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असेही गावडे यांनी सांगितले.

 

Web Title: pm narendra modi in goa on 26 to attendance at the opening ceremony of the national sports tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा