हुल्लडबाजीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधू : मुख्यमंत्री

By Admin | Published: September 13, 2015 03:02 AM2015-09-13T03:02:44+5:302015-09-13T03:03:08+5:30

पणजी : म्हादईप्रश्नी लोकांना चिथवून व जमवून कर्नाटक-गोवा सीमेवर शनिवारी हुल्लडबाजी करण्याचा जो प्रकार कर्नाटकमधील राजकारण्यांकडून करण्यात आला,

PM's remarks against hooliganism: Chief Minister | हुल्लडबाजीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधू : मुख्यमंत्री

हुल्लडबाजीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधू : मुख्यमंत्री

googlenewsNext

पणजी : म्हादईप्रश्नी लोकांना चिथवून व जमवून कर्नाटक-गोवा सीमेवर शनिवारी हुल्लडबाजी करण्याचा जो प्रकार कर्नाटकमधील राजकारण्यांकडून करण्यात आला, त्याचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी निषेध केला आहे. कर्नाटकमधील काँग्रेस या प्रकारास जबाबदार असून आपण पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून किंवा पत्र लिहून त्यांचे लक्ष या विषयाकडे वेधेन. तसेच कर्नाटक-गोवाच्या सीमेवर जिथे समस्या निर्माण होत आहे, तिथे केंद्रीय सुरक्षा दलाची नियुक्ती करावी, अशी विनंती पंतप्रधानांना करीन, असे मुख्यमंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. म्हादईचा कालवा जबरदस्तीने खुला करण्याचा जमावाचा प्रयत्न होता. (पान २ वर)

Web Title: PM's remarks against hooliganism: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.