गोव्यातील फात्राडेत इव्हेन्ट आयोजकांवर पोलिसांची कारवाई; कायद्याचे उल्लंघन करणारे पोलिसांच्या कचाटयात
By सूरज.नाईकपवार | Updated: March 31, 2024 12:55 IST2024-03-31T12:55:40+5:302024-03-31T12:55:54+5:30
उपजिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे संशयितांनी उल्लंघन केले आहे

गोव्यातील फात्राडेत इव्हेन्ट आयोजकांवर पोलिसांची कारवाई; कायद्याचे उल्लंघन करणारे पोलिसांच्या कचाटयात
सूरज नाईक पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: बाहेरील राज्यातील इव्हेन्ट आयोजक कायदयाचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले असून, गोव्यातील सासष्टीतील किनारपट्टी भागातील कोलवा पोलिसांनी शनिवारी रात्री एका कारवाईत संशयितांवर कारवाई केली. विवाह संभारच्यावेळी संशयितांकडून वरील आगळीक करण्यात आली.फात्राडे किनाऱ्यावरील कारवेला बीच रिसोर्टच्या मागील बाजूला एक इव्हेंन्ट सुरु होता. आयोजकाकडून कायदयाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्याने कोलवा पोलिसांनी संबधितांवर कारवाई केली. प्रबलिस इव्हेंन्ट आयोजक, गफुर कासिम खान, आदित्य दातानी , गुलशन शर्मा व अन्य जणांचा यात समावेश आहे.
फटाक्यांची आतषबाजी, समुद्र किनाऱ्यावर ड्रॉन उडविणे आदी प्रकार चालू होते. उपजिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे संशयितांनी उल्लंघन केले आहे. भादंंसंच्या ३३६,१८८ कलमाखाली संशयितांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपा देईकर पुढील तपास करीत आहेत.