वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात पोलीस आक्रमक; १० दिवसांत ३,५२२ जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 04:02 PM2023-02-22T16:02:19+5:302023-02-22T16:02:58+5:30
राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी गोवा पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी गोवा पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या १० दिवसांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३ हजार ५२२ जणांवर गोवा पोलिसांनी कारवाई केली आहे.
उत्तर गोव्यात पोलिसांनी ही धडक कारवाई सुरु केली आहे. पोलिस ठिकठिकाणी थांबून वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. यात वाहन चालवताना काळ्या काचा लावणे, वाहन वेगाने हाकणे, मद्यपान करून वाहन चालवणे, बेशिस्तपणे वाहन चावलणे आदी उल्लंघनाचा यात समावेश आहे. नियम मोडणाऱ्याना 'तालांव' दिला जात आहे.
उत्तर गोव्यात १० दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. यात डिचोलीत सर्वाधिक ४४९ जणांवर कारवाई झाली. कोलवाळ येथे ४३८ जणांवर तर म्हापसा येथे ३५८ जणांवर कारवाई झाली. त्याखालोखाल साळगावात ३३८ जणांवर कारवाई करण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"