...अन् परदेशी पाहुण्याच्या घरात सापडली अमली पदार्थांची प्रयोगशाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 05:24 PM2018-11-29T17:24:56+5:302018-11-29T17:27:47+5:30

विविध रसायनांसह 1 कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त

police arrested austrian citizen seized drugs worth rupees 1 crore | ...अन् परदेशी पाहुण्याच्या घरात सापडली अमली पदार्थांची प्रयोगशाळा

...अन् परदेशी पाहुण्याच्या घरात सापडली अमली पदार्थांची प्रयोगशाळा

Next

म्हापसा : हणजूण पोलिसांनी केलेल्या कारवाईत येथे चालू असलेली अमली पदार्थाची प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली. या धाडीत विविध प्रकारच्या रसायनासह अंदाजे १ कोटी ३ लाख किंमतीचा अमली पदार्थ जप्त केला. हणजूण पोलिसांनी यंदाच्या पर्यटन हंगामातील पहिली व हणजूण पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. 

हणजूण येथील स्टारको जंक्शनजवळ अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हणजूण पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विदेश पिळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी २६ नोव्हेंबरच्या सायंकाळी ५ वाजता सापळा रचला असता, कोलेर ख्रिस्तीना (३५) हा ऑस्ट्रियन नागरिक संशयीतरित्या फिरताना सापडला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एमडीएमए, डीजीएल, चरस, कॅटामाईन, अ‍ॅफ्टामाईन असे एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचे अमली पदार्थ सापडले. 

कोलेर ख्रिस्तीनाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या माझलवाडो-हणजूण येथील भाड्याच्या घराची झडती घेतली. याठिकाणी पोलिसांना अमली पदार्थ तयार करण्याची रासायनिक प्रयोगशाळा असल्याचे आढळले. त्या ठिकाणी विषासह एकवीस प्रकारची विविध रसायने व अमली पदार्थाचा कच्चा माल सापडला. त्या सर्वांची किंमत १ कोटी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांना त्या घरातून दोन फ्रिज, रासायनिक प्रयोगशाळेसाठी लागणारे सर्व सामान सापडले. पोलिसांनी सर्व सामान ताब्यात घेऊन संशयित कोलेर याचे विरूद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केली आहे. निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विदेश पिळगावकर पुढील तापस करत आहेत.
 

Web Title: police arrested austrian citizen seized drugs worth rupees 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.