पोलीस मिकींना पकडू शकत नाहीत, ही तर शरमेची बाब..!

By admin | Published: April 22, 2015 01:46 AM2015-04-22T01:46:29+5:302015-04-22T01:46:49+5:30

मडगाव : दहा दिवस उलटले तरी सध्या गायब असलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांना पोलीस पकडू शकत नाहीत, ही शरमेची गोष्ट असून यासंबंधात

Police can not catch Mickey, this is a matter of shame! | पोलीस मिकींना पकडू शकत नाहीत, ही तर शरमेची बाब..!

पोलीस मिकींना पकडू शकत नाहीत, ही तर शरमेची बाब..!

Next

मडगाव : दहा दिवस उलटले तरी सध्या गायब असलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांना पोलीस पकडू शकत नाहीत, ही शरमेची गोष्ट असून यासंबंधात काहीतरी ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे, अशा शब्दांत मडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कवळेकर यांनी पोलिसांना फटकारले.
सध्या गायब असलेले पाशेको यांच्याविरोधात अटक वॉरन्ट जारी करून ११ दिवस उलटले आहेत. पाच दिवसांनी वाढवलेली वॉरन्टची मुदत बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर न्या. कवळेकर यांनी मंगळवारी खुल्या न्यायालयात ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पाशेको हे सध्या गायब असल्यामुळे ते मुद्दामहून अटक चुकवत असल्याचा दावा करून त्यांच्यावर एफआयआर दाखल करून घ्यावा, यासाठी आयरिश रॉड्रिग्स यांनी केलेल्या अर्जावरचा निकाल त्यांनी २७ एप्रिलपर्यंत राखून ठेवला.
दरम्यान, साहाय्यक सरकारी वकील शिल्पा नागवेकर यांनी फौजदारी आचारसंहितेच्या १९५ कलमाचा दाखला देत अशा प्रकारच्या अर्जाची दखल न्यायालयाला घेता येणे शक्य नाही, असा दावा केला. पाशेको यांच्याविरोधात रॉड्रिग्स यांनी कोलवा पोलिसांत जी अदखलपात्र तक्रार दिली आहे, त्याची दखल न्यायालयाने घेऊन एफआयआर नोंद करण्याचा पोलिसांना आदेश द्यावा, असा रॉड्रिग्स यांचा दावा आहे.
या प्रकरणी युक्तिवाद करताना अ‍ॅड. रॉड्रिग्स म्हणाले, ज्या अर्थी पाशेको हे गायब झाल्याची तक्रार त्यांच्या घरच्यांनीही केली नाही आणि विधिमंडळ सचिवालयातूनही तशी तक्रार आली नाही, त्या अर्थी पाशेको गायब नसून ते मुद्दामहून अटक चुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि यासाठी त्यांना पोलिसांचा पाठिंबा मिळत आहे. पाशेको यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर शरण येण्यासाठी एक महिन्याचा अवधी मिळू शकतो. यासाठीच पोलिसांनी हा अर्ज केल्याचा दावा त्यांनी केला. यासंबंधी जो तपास चालू आहे, त्यावरही न्यायालयाने देखरेख ठेवावी, अशीही मागणी रॉड्रिग्स यांनी केली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Police can not catch Mickey, this is a matter of shame!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.