मारेकर्‍यांच्या यादीत मावजो यांचे नाव आढळल्यानेच पोलीस संरक्षण : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:04 PM2018-07-27T22:04:53+5:302018-07-27T22:04:56+5:30

Police conservation due to Mavo's name found in the killers list: CM | मारेकर्‍यांच्या यादीत मावजो यांचे नाव आढळल्यानेच पोलीस संरक्षण : मुख्यमंत्री

मारेकर्‍यांच्या यादीत मावजो यांचे नाव आढळल्यानेच पोलीस संरक्षण : मुख्यमंत्री

Next
<p>पणजी: गौरी लंकेश यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांच्या यादीत प्रसिद्ध कोकणी साहित्यिक तथा विचारवंत दामोदर मावजो यांचे नाव आढळल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने सतर्क केले आणि त्यावरूनच मावजो यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत दिली.

या प्रकरणात सनातन संस्थेकडे संशयाची सुई जात असल्याने तसेच सनातनचे मुख्यालय गोव्यात असल्याने या संस्थेची कसून चौकशी करावी, अशी मागणी आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विधानसभेत शून्य प्रहराला केली. कोकणी साहित्यिक व विचारवंत दामोदर मावजो यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की ' कोणावर गोळ्या झाडून त्यांचे विचार थांबवता येणार नाहीत'. मावजो यांना पुरेसे संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. 'मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सनातन संस्थेकडे बोट दाखवले गेले आहे. या संस्थेची चौकशी करा, आम्हाला गोव्यात अतिरेकी नकोत, ' असे रेजिनाल्ड म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मावजो यांना पुरेसे पोलीस संरक्षण दिले असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.

Web Title: Police conservation due to Mavo's name found in the killers list: CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.