धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त, बार्देश तालुक्यातील पोलीस गस्तीत वाढ
By काशिराम म्हांबरे | Published: August 17, 2023 04:42 PM2023-08-17T16:42:54+5:302023-08-17T16:44:09+5:30
मंदिरे, चर्च तसेच पुतळ््या सारख्या स्थळांवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्तात तैनात ठेवण्यात आला आहे.
म्हापसा - सोमवार १४ आॅगस्ट रोजी करासवाडा म्हापसा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेनंतर बार्देश तालुक्यातील पोलीस गस्तीत वाढ करण्यात आली आहे. मंदिरे, चर्च तसेच पुतळ््या सारख्या स्थळांवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्तात तैनात ठेवण्यात आला आहे.
करासवाडा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार सोमवारी पहाटेच्या दरम्यान घडला होता. त्यानंतर पोलिसांनी तिघा संशयितांना मंगळवारी अटक करुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचेपोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान आढळून आलेहोते.
त्यानंतर बार्देश तालुक्यातील धार्मिक स्थळांवरील पोलिसांच्या पहाºयात वाढ करण्यात आली आहे. काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी दोन अशा प्रकारेपोलिसांकडून दिवस रात्र पहारा ठेवला जात आहे.
पोलीस उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोक्याच्या ठिकाणातील बंदोबस्तात वाढ केल्याचे ते म्हणाले. समाजात सलोखा कामय रहावा तसेच खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यकेतनुसार त्यात बदल जाईल अशी माहिती दळवी यांनी दिली.