नेवरा येथे तोतया पोलिसांनी महिलेचे दागिने केले लंपास
By पूजा प्रभूगावकर | Updated: May 15, 2024 13:06 IST2024-05-15T13:06:10+5:302024-05-15T13:06:30+5:30
पणजी: तोतया पोलिसांनी नेवरा येथील एका महिलेचे २.७३ लाख रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी आगशी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल ...

नेवरा येथे तोतया पोलिसांनी महिलेचे दागिने केले लंपास
पणजी: तोतया पोलिसांनी नेवरा येथील एका महिलेचे २.७३ लाख रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी आगशी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस चोरटयांचा शोध घेत आहेत.
सदर घटना ही धाकटे नेवरा येथे मंगळवारी घडली. महिला ही सातेरी मंदिरात जात असताना तिला वाटेत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवून आपण पोलिस असल्याचे सांगितले. पुढे एक घटना घडली असल्याने अंगावर दागिने घालून जावू नये . ते सुरक्षित नाही असे म्हणत ते काढण्यास लावले.
या महिलेने आपल्या गळ्यातील सोनसाखळी काढताच या तोतया पोलिसांनी ती स्वत:कडे ठेवली. मात्र तिने आरडाओरडा केल्यानंतर तिला ती परत दिली. त्यानंतर या चोरटयांनी तिला तिच्या हातातील सोन्याच्या बांगडया तसेच सोनसाखळी काढून कागदात बांध असे सांगितले. या महिलेने त्यांचे ऐकून त्यांना दागिने दिले. चोरटयांनी ते कागदात बांधले व तिला परत केले व ते निघून गेले. मात्र तिने कागद उघडून बघितल्यानंतर त्यात सोन्याच्या बांगडयांएवजी दगड असल्याचे समजताच आपल्याला तोतया पोलिसांनी लुटल्याचे तिला समजले.