पर्वरीत वाहतूक कोंडी वाढते पाेलिसांनी गाड्या थांबवून तपासणी करु नये; पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांचे पाेलिसांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 03:23 PM2024-05-30T15:23:05+5:302024-05-30T15:23:49+5:30
पर्वरी मतदारसंघातील मान्सून कामाची बैठक घेतली यात पंचायत लाेकप्रतिनिधी उपस्थित होते.
नारायण गावस, पणजी: पर्वरी महामार्गावर वाहतूक कोंडी वाढत असल्याने या रस्त्यांवर वाहतूक पाेलिसांनी गाड्या अडवून तपासणी करु नये. यासाठी वाहतूक अधीक्षक तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे, असे पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांनी सांगितले. गुरुवारी पर्वरी मंत्रालयात मंत्री राेहन खंवटे यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत पर्वरी मतदारसंघातील मान्सून कामाची बैठक घेतली यात पंचायत लाेकप्रतिनिधी उपस्थित होते.
पर्वरीतील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी हाेत असते त्यात वाहतूक पाेलीस मध्येच राहून वाहनांना दंड घालत असल्याने वाहतूक कोंडी वाढते. त्यामुळे पाेलिसांनी पर्वरी काढून सुकूर किंवा पणजीत वाहनांची तपासणी करावी. यामुळे या भागातील वाहतूक काेंडी कमी होऊ शकते. मंत्री राेहन खंवटे म्हणाले या विषयी आम्ही वाहतूक पाेलिसांना आदेश दिले आहे. तसेच पर्वरी परिसरात बेकायदेशीर रस्त्यांचे खोदकाम करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.
मंत्री राेहन खंवटे म्हणाले, या बैठकीत पर्वरीतील वीज समस्या, पाणी समस्या तसेच आराेग्य तसेच इतर सेवाविषयी चर्चा करण्यात आली. यात उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांना १५ दिवसांनी या बैठकीचा पंचायत प्रतिनिधीसोबत आढावा घेण्यास सांगितले आहे. पर्वरी भागात यंदा डेंग्यूचे रुग्ण वाढू नये यासाठी खास काळजी घेण्याचे आवाहन आराेग्य अधिकाऱ्यांना केेले आहे. तसेच या परिसरात वारंवार वीज जात असल्याने त्यांची ही समस्या दूर करण्याचे आदेश वीज अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे पर्वरी मतदारसंघात भागातील शेतीमध्ये पाणी घुसते तसेच शेतकऱ्यांच्या इतर समस्या जाणून घेण्यास कृषी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
मंत्री खंवटे म्हणाले, पर्वरी महमार्गावर उड्डाण पूल हाेणार आहे पण त्यासाठी अगोदर आम्ही या रस्त्यांची राहीलेली कामे पूर्ण करणार आहोत. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड राेडची कामे अगोदर करणार आहोत. यात सर्व पंचायत प्रतिनिधींना एकत्र घेऊन ही कामे केली जाणार आहे. तसेच या रस्त्याच्या चौपदीकरणासाठी अगोदर लोकांना विश्वासात घेतले जाणार आहे. महामार्ग प्राधिकरणाशी या विषयी चर्चा करण्यात येणार तसेच मुख्यमंत्र्यांच्या पाहणी नंतर याचे काम हाती घेतले जाणार आहे. पर्वरीतील नागरिकांना व्यापाऱ्यांना कुठलाच त्रास हाेणार नाही याची पूर्णतयारी करुन महामार्गाचे काम आणि उड्डाण पुलाचे काम होणार आहे.
मंत्री खंवटे म्हणाले, अनेक पर्यटक साेशल मिडीयावर पाहून असुरक्षित स्थळावर जात असतात आणि तिथे कुठलीच सुरक्षितता नसल्याने आपला जीव गमावतात. यासाठी आता पर्यटन खाते परिपत्रक जारी करुन किंवा जागृती निर्माण करुन पर्यटक आणि स्थानिकांनी कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यास सांगेल जाणार आहे. यामुळे असुरक्षित ठिकाणी पर्यटन जाणार नाही. स्थानिकांनीही याची दखल घ्यावी आपल्या भागातील असुरक्षित चिरेखाणीत तसेच इतर भागात जाऊ नये.