पोलिसांनी आंदोलकांना पिटाळले

By admin | Published: March 12, 2015 01:49 AM2015-03-12T01:49:22+5:302015-03-12T01:55:18+5:30

पणजी : पोट भरल्यानंतर पोट धरून हसण्यासाठी उपाशी तसेच अर्धपोटी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना बुधवारी

Police threw protesters | पोलिसांनी आंदोलकांना पिटाळले

पोलिसांनी आंदोलकांना पिटाळले

Next

पणजी : पोट भरल्यानंतर पोट धरून हसण्यासाठी उपाशी तसेच अर्धपोटी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना बुधवारी सरकारने जबरदस्तीने हटविले. पोटासाठीच रस्त्यावर उतरावे लागलेल्या या सुरक्षा रक्षकांना राजसत्तेपुढे अखेर माघार घ्यावी लागली आणि चंबुगबाळे गुंडाळून कांपाल मैदान गाठावे लागले. शिमगोत्सवाच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमास विघ्न नको म्हणून दोन महिने आंदोलन करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अक्षरश: पिटाळले. सुरक्षा रक्षकांनी हटण्यास प्रारंभी विरोध केल्याने पोलिसांनी सरकारची ताकद दाखवली. हा आघात सहन न झाल्याने एका सुरक्षा रक्षकाने आंदोलनस्थळीच गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस, आंदोलकांचे नेते आणि सुरक्षा रक्षकांच्या झटापटीत आझाद मैदानावर सुमारे दीड तास तणाव निर्माण झाला होता.
कित्येक वर्षे आझाद मैदानावर शिगमोत्सवाचे कार्यक्रम होतात. तेथे यंदा सुरक्षा रक्षक आणि १0८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सुरक्षा रक्षक दिवस-रात्र आंदोलन करत असल्याने जेवण बनविणे, कपडे धुणे, सुकविणे आदी सर्व कामे त्यांना मैदानावरच करावी लागत. त्यामुळे महोत्सवाच्या सजावटीला, तसेच कार्यक्रमाला बाधा येणार होती.
जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
दुसरे असे की या मैदानावर १७ मार्चपर्यंत आंदोलनास बसण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. या संदर्भातील नोटीस आंदोलकांना चार दिवसांपूर्वी दिली होती. मात्र, सुरक्षा रक्षकांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आंदोलकांना हटविण्यासाठी बुधवारी सकाळी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या
(पान २ वर)

Web Title: Police threw protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.