गोव्यासाठी नैसर्गिक स्रोत धोरण हवे; नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 08:11 AM2019-02-23T08:11:06+5:302019-02-23T08:14:19+5:30
समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले.
पणजी - समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले. गोव्यासाठी नैसर्गिक स्रोत धोरणाची गरजीही त्यांनी व्यक्त केली आहे.
कला अकादमी संकुलात गोवा लाइव्हलीवूड फोरमने आयोजित केलेल्या उदरनिर्वाह या विषयावर चर्चासत्रात ते बोलत होते. प्रफुल्ल समंतरा यांनी ओडिशात वनक्षेत्रात खाणींविरोधात तब्बल १२ वर्षे लढा दिला तसेच नियामगिरी डोंगरकपारीत खाणींसाठी घरे गमावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले. ओडिशातील डोंगरिया कोंढ समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
हरित चळवळीत मोठा वाटा असलेले समंतरा यांनी स्वयंपोषकता आणि विकास यावरही भाष्य केले. वित्त खात्याचे सचिव दौलत हवालदार, आघाडीचे उद्योजक तथा ‘मेट’चे अध्यक्ष नितीन कुंकळ्येंकर हे याप्रसंगी उपस्थित होते. गोवा लाइव्हलीवूड फोरमने अध्यक्ष चारुदत्त पाणीग्रही यांनी उद्देश स्पष्ट केला. हवालदार म्हणाले की, आज जगभरात असमानता आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनाला धोका पोचला आहे.