१0 खाणींच्या लिज क्षेत्रात प्रदूषण

By admin | Published: May 22, 2015 02:29 AM2015-05-22T02:29:44+5:302015-05-22T02:29:58+5:30

पणजी : राज्यातील १0 खाणींच्या लिज क्षेत्रात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारपासून तपासणी सुरू केली आहे. लिज नूतनीकरण झालेल्या सर्व खाणींना जल,

Pollution in 10 lining areas | १0 खाणींच्या लिज क्षेत्रात प्रदूषण

१0 खाणींच्या लिज क्षेत्रात प्रदूषण

Next

पणजी : राज्यातील १0 खाणींच्या लिज क्षेत्रात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारपासून तपासणी सुरू केली आहे. लिज नूतनीकरण झालेल्या सर्व खाणींना जल, हवा कायद्याखाली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दाखले घ्यावे लागणार आहेत, त्यासाठीच मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली आहे. सर्व खातरजमा केल्यानंतरच
परवाने दिले जाणार आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जुझे नोरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिज नूतनीकरण झालेल्या सर्व खाणींना हे परवाने घ्यावे लागतील आणि सर्व गोष्टींची खातरजमा केल्यानंतरच ते दिले जातील. लिज नूतनीकरण झालेल्या प्रत्येक खाण कंपनीला या परवान्यांसाठी
मंडळाकडे अर्ज करावे लागणार आहेत.
१७ लिजांच्या कायदेशीर वैधतेबाबत गोवा फाउंडेशनने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आक्षेप घेतलेला आहे. केंद्राने १९५७ चा एमएमडीआर कायदा वटहुकूम काढून दुरुस्त केला त्याच दिवशी १२ जानेवारीला या लिजांचे नूतनीकरण झाले. लिजांचा लिलाव करण्याची महत्त्वाची तरतूद या दुरुस्तीत होती, त्यामुळेच घिसाडघाईने या १७ लिजांचे नूतनीकरण केल्याचा संघटनेचा आरोप आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pollution in 10 lining areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.