दिवाळीत ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रदूषण मंडळ सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 02:19 PM2023-11-11T14:19:11+5:302023-11-11T14:20:21+5:30

राज्यातील दिवाळी निमित्त होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाची मोजणी करण्यासाठी गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळ सक्रिय.

Pollution Board activated to control noise pollution during Diwali in goa | दिवाळीत ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रदूषण मंडळ सक्रिय

दिवाळीत ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी प्रदूषण मंडळ सक्रिय

पणजी: गोवाप्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राज्यातील दिवाळी निमित्त होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाची मोजणी करण्यासाठी विविध मीटर बसविण्यात आले आहेत.  दिवाळीत निमित्त होणाऱ्या  फटाक्यांचा व इतर संगीताचा कर्णकश आवाजाने राज्यातील ध्वनी प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी पोलीस स्थानकावर ध्वनी मोजणी मीटर बसविण्यात आले आहेत. अशी माहिती प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली

दोन दिवसापूर्वी गोवा प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील काही भागांचा ध्वनी प्रदूषणाचा आढावा घेतला आहे. तसेच आज रात्री या विविध भागांची तपासणी केली जाणार आहे. तसेच  दिवाळी नंतर किती ध्वनी प्रदूषण झाले यांची माहिती गोळा केली जाणार आहे.  

सध्या मडगाव, पणजी तसेच इतर काही महत्वाच्या ठिकाणी ध्वनी मोजणी करण्यासाठी मशीन बसविण्यात आलेली वाहने आली आहे. तसेच आता पोलीस स्थानकावर ध्वनी मोजणी करणारी मीटर बसविली आहेत. पोलीसांमार्फत या आवाजाची  पाहणी केली जाणार आहे.  दिवाळी निमित्त ध्वनी प्रदूषण तसेच काही ठिकाणी हवा प्रदुषण होत असल्याने गाेवा प्रदुषण मंडळातर्फे या मीटर बसविण्यात आली आहे. या मीटर नुसार या प्रदूषणाची एकूण वाढ किती झाली याची माहिती मंडळाला मिळणार आहे. 
   
राज्यात आता  दिवाळी  तसेच नवीन वर्ष  येणार असल्याने बहुतेक ठिकाणी फटाके तसेच पार्ट्या केल्या जात असल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या  प्रमाणात आवाज प्रदुषण केले जाते. याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण मंडळ ही मशिन बसविली आहेत.

Web Title: Pollution Board activated to control noise pollution during Diwali in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.