फोंडा, तिसवाडीला भिवपाची गरज ना! सुभाष शिरोडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 08:51 AM2023-06-22T08:51:21+5:302023-06-22T08:52:28+5:30

म्हादई खोऱ्यातील पावसामुळे ओपा पातळी प्रकल्पाची वाढल्याचा दावा

ponda tiswadi does not need fear says subhash shirodkar | फोंडा, तिसवाडीला भिवपाची गरज ना! सुभाष शिरोडकर

फोंडा, तिसवाडीला भिवपाची गरज ना! सुभाष शिरोडकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पावसाने पाठ फिरवल्याने धरणे आटत असली तरी फोडा व तिसवाडी तालुक्यांना पाण्याची समस्या भासणार नाही, असा दावा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केला आहे.

शिरोडकर म्हणाले की, म्हादई खोऱ्याच्या वरच्या भागात मोले वगैरे ठिकाणी पाऊस पडल्याने ओपा प्रकल्पाच्या जलाशयाची पातळी वाढली आहे. मंगळवारी हा जलाशय भरून ओव्हर फ्लो झाला. पंचवाडी धरणातही २ टक्के पाणी झाले आहे. अंजुणे धरणाची पातळी मात्र लक्षणीय घटल्याने धरणावर अवलंबून असलेल्या पडोशे प्रकल्पात विकारी'चे पाणी आणले जाईल, त्यासाठी अस्नोड्याहून पडोशेपर्यंतची वापरात नसलेली बांधकाम खात्याची जुनी जलवाहिनी उपयोगात आणली जाईल. शनिवारपर्यंत ही व्यवस्था होईल.

पडोशे प्रकल्प तग धरुन 

पडोशे जलशुध्दीकरण प्रकल्प बंद पडला असल्याचे वृत्त जलस्रोतमंत्री सुभाष फळदेसाई यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, अजुणे धरणाचे पाणी कमी झाले असले तरी जे काही पाणी उपलब्ध आहे, त्यावर गुजराण चालली असून हा प्रकल्प तग धरुन आहे. शनिवारपर्यंत 'तिळारीचे पाणी उपलब्ध झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण वेगाने कार्यरत होईल.

अंजुणे धरणात ३० दिवसांचा साठा

अजुणे धरणातील पाणीसाठा पूर्ण कमी झाला आहे. सध्या अंजुणे धरणात ३० दिवस पुरेल एवढाच साठा आहे. साळ नदीतून पंपिंगच्या माध्यमातून आमठाणे धरणात पाणी साठवले जात आहे. त्याचा उपयोग अस्नोडा प्रकल्पासाठी होतो. डिचोली व वाळवंटी नदीतील पाण्यातही कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: ponda tiswadi does not need fear says subhash shirodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.