पोर्तुगीज नागरिकत्व: मिनाक्षी लेखी यांना मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री भेटले
By वासुदेव.पागी | Published: February 17, 2024 05:26 PM2024-02-17T17:26:25+5:302024-02-17T17:26:44+5:30
युरोपात मुक्त व्हिसा मिळावा यासाठी पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन भारतीय नागरिकत्व सोडण्याचा जो सपाटा चालविला आहे आणि त्यानंतर या लोकांना ज्या समस्यांना तोंड द्याव्या लागतात त्या समस्यांच्या अनुशंगाने ही भेट घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
पणजी: पोर्तुगीज नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून विदेशात असलेल्या गोमंतकीय नागरिकांच्या समस्या घेऊन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री मिनाक्षी लेखी यांची भेट घेतली. या भेटीत विदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या गोमंतकियांच्या समस्यांवर त्यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
युरोपात मुक्त व्हिसा मिळावा यासाठी पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन भारतीय नागरिकत्व सोडण्याचा जो सपाटा चालविला आहे आणि त्यानंतर या लोकांना ज्या समस्यांना तोंड द्याव्या लागतात त्या समस्यांच्या अनुशंगाने ही भेट घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
एकदा गोमंतकीय पासपोर्ट पासपोर्ट सोडल्यावर भारतीयांना अनिवासीय भारतीय ओळखपत्रे मिळविण्यासही अडचणी होत आहेत असे गाऱ्हाणेही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे घातल्याची माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री लेखी यांनी त्यांना काय आश्वासन दिले या बाबतीत मात्र कुणीही स्पष्ट केलेले नाही.
दरम्यान मुख्यमंत्री आपल्या दिल्ली दौऱ्या दरम्यान नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांना भेटले. गोव्यात जागतिक बँकच्या सहाय्याने केलेल्या विकास कामाची आणि आपद्कालीन कामाची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयोगाला सादर केली.