पाली-सत्तरीत माकडतापानंतर आता जनावरांचा रोग
By admin | Published: May 19, 2017 02:51 AM2017-05-19T02:51:12+5:302017-05-19T02:54:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कवाळपई : पाली-सत्तरीत दोन वर्षांपूर्वी माकडतापाने उद्रेक केला होता. त्या उद्रेकातून सावरतोय तोच पालीत जनावरांचा रोग फैलावला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळपई : पाली-सत्तरीत दोन वर्षांपूर्वी माकडतापाने उद्रेक केला होता. त्या उद्रेकातून सावरतोय तोच पालीत जनावरांचा रोग फैलावला असून आतापर्यंत १६ गुरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाली-सत्तरीत भीतीचे वातावरण आहे. पाली-सत्तरीतील गुरे उभी असतानाच खाली कोसळतात व त्यानंतर दोन तासांनी तडफडून त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे हा कसला नवा रोग आला असल्याचे प्रश्नचिन्ह नागरिकांना पडले आहे. जर सर्पदंश म्हणावा तर १६ गुरांना कसा होणार त्यामुळे आतापर्यंत हा रोग कोणता आहे हे अजूनही स्पष्ट झाले नाही. पाली गावातील गुरे ठिकठिकाणी मृत होण्याचा प्रकार वाढला असून त्यांच्यावर गावठी उपाय करून पाहिला; पण त्यावर निदान होताना दिसत नाही. गेल्या चार दिवसांत सोळा गुरे मृत्यू पावल्याने रोगाचे निदान होणे कठीण झाले आहे. गावातील अनेक घरांत गुरांचे शेण जमिनी सारवण्यासाठी वापरतात. रोगामुळे गुरांचे शेण वापरले तर जंतूंचा प्रादुर्भाव माणसांना तर होणार नाही ना,
अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे.
पाली-सत्तरीत दोन वर्षांपूर्वी माकडतापाने थैमान घातले होते. त्या रोगाचे निदान तीन महिने झालेच नव्हते. त्या वेळी पाली-सत्तरीत नागरिकांत भीतीचे वातावरण होते. तीच स्थिती सध्या पाली-सत्तरीत असून त्यावर सरकारने निदान करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.