वीज घोटाळा प्रकरण: एक संशयित गैरहजर: हमिदाराला न्यायालयाकडून बजाविली गेली नोटीस

By सूरज.नाईकपवार | Published: January 19, 2024 06:43 PM2024-01-19T18:43:51+5:302024-01-19T18:44:14+5:30

कृष्णकुमार यांच्या वकिलांनी अनुपस्थित राहण्यासंबधीचा अर्ज न्यायालयात सादर केला.

Power scam case A suspect absent notice by court | वीज घोटाळा प्रकरण: एक संशयित गैरहजर: हमिदाराला न्यायालयाकडून बजाविली गेली नोटीस

वीज घोटाळा प्रकरण: एक संशयित गैरहजर: हमिदाराला न्यायालयाकडून बजाविली गेली नोटीस

मडगाव: गोव्याचे वाहतुकमंत्री माविन गुदीन्हो हे प्रमुख संशयित असलेल्या कथित वीज घोटाळा प्रकरणात आज शुक्रवारच्या सुनावणीच्यावेळी एक संशयित राधाकृष्णन हे गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्याला हमिदार राहिलेल्या नोटीस जारी केली आहे पुढील सुनावणीच्या वेळी त्याला न्यायालयात हजर राहण्यास बजाविले आहे. या खटल्याची आता पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे.

येथील खास न्यायालयात या खटल्याची सुनावणी चालू आहे. मंत्री गुदीन्हो यांना या खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा यापुर्वीच न्यायालयाने दिलेली आहे. अन्य एक संशयित वीज खात्याचे माजी प्रमुख अभियंते टी. नागराजन शुक्रवारी सुनावणीस हजर होते.संशियत कंपन्याचे प्रतिनीधीही हजर होते . मात्र कृष्णकुमार व राधाकृष्ण हे अनुपस्थित होते. यातील कृष्णकुमार यांच्या वकिलांनी अनुपस्थित राहण्यासंबधीचा अर्ज न्यायालयात सादर केला.

यापुर्वी झालेल्या सुनावणीच्यावेळी तिघा साक्षिदारांना कालच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, त्याचे मृत्यू दाखला सादर करण्यात आला आहे.तर अन्य दोघांना वॉटसअपवरुन समन्स पाठविले होते. हे साक्षिदार पुढील सुनावणीस हजर राहणार असल्याचे सरकारी वकिलाने सांगितले

Web Title: Power scam case A suspect absent notice by court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा