गोव्याच्या सभापतीपदी प्रमोद सावंत यांची निवड
By admin | Published: March 22, 2017 03:40 PM2017-03-22T15:40:25+5:302017-03-22T15:40:25+5:30
गोवा विधानसभेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार डाॅ. प्रमोद सावंत यांची निवड झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 22 - गोवा विधानसभेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार डाॅ. प्रमोद सावंत यांची निवड झाली आहे. आज झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सावंत हे वीसविरुद्ध पंधरा अशा मतांच्या फरकाने विजयी झाले.
प्रमोद सावंत यांना प्रथमच सभापती होण्याची संधी मिळाली आहे. सावंत यांच्याविरुद्ध काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लाॅरेन्स यांनी उमेदवारी सादर केली होती. लाॅरेन्स हे विधानसभा सभागृहात उशिरा पोहचले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यानी सभापती निवडीवेळी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही.
आपण सभापती म्हणून नि:पक्षपाती पद्धतीने काम करीन. आपण या पदाची शान व प्रतिष्ठा पूर्णपणे जपेन असे सभापतीपदी निवडून आल्यानंतर प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सभापतींचे अभिनंदन केले.