प्रतापसिंग राणेंनी ११ वेळा राखला सत्तरीचा गड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 07:47 PM2017-03-11T19:47:53+5:302017-03-11T19:49:49+5:30

गोवा विधानसभेच्या निवडणुकीत सत्तरी तालुक्याचे अनभिषिक्त सम्राट तथा सत्तरीचे मोकासदार (जमीनदार) प्रतापसिंग रावजी राणे यांनी सलग अकारवेळा विधानसभा निवडणुकीत विजयाची

Pratap Singh Ranee 11 times the fort of fortune! | प्रतापसिंग राणेंनी ११ वेळा राखला सत्तरीचा गड!

प्रतापसिंग राणेंनी ११ वेळा राखला सत्तरीचा गड!

Next

साखळी (गोवा)

गोवा विधानसभेच्या निवडणुकीत सत्तरी तालुक्याचे अनभिषिक्त सम्राट तथा सत्तरीचे मोकासदार (जमीनदार) प्रतापसिंग रावजी राणे यांनी सलग अकारवेळा विधानसभा निवडणुकीत विजयाची पताका फडकवली. पर्ये विधानसभा मतदारसंघातील लोकांचा विश्वास संपादन करून निवडणूक काळात विरोधकांनी केलेला अपप्रचार, अफवा यांना पूर्णविराम देण्यात ७८व्या वर्षी ते यशस्वी ठरले. त्यांनी राजकारणातील सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल केली. त्यांनी या वेळी पाच हजार मतांची आघाडी घेतली. ९ फेबु्रवारी २०१३ रोजी गोवा विधानसभेला ४९ वर्षे पूर्ण झाली आणि त्याच दिवशी प्रतापसिंग राणे यांना गोव्याच्या राजकारणात ४० वर्षे पूर्ण झाली. विधानसभेच्या ४९ व्या वर्षी प्रतापसिंग राणे विरोधी पक्षनेते होते.

१९७२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा गोवा विधानसभेत प्रवेश केला. सुरुवातीला सत्तरी तालुक्यात सत्तरी हा एकच मतदारसंघ होता. पहिल्यांदा १९७२ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या(मगोप) उमेदवारीवर ते निवडून आले. त्यांनी पहिली निवडणूक गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या आग्रहास्तव लढविली आणि त्यांच्याच प्रेरणेने राजकारणात त्यांनी प्रवेश केला होता. दुसरी निवडणूक १९७७ मध्ये कॉँग्रेस पक्षातर्फे, तिसरी १९८० मध्ये अर्स काँग्रेस, चौथी १९८४ मध्ये काँग्रेस, तर सत्तरी तालुक्याचे वाळपई व पर्ये असे दोन मतदारसंघ झाल्याने १९८९ पासून काँगे्रसच्या उमेदवारीवर पर्ये मतदारसंघातून सात वेळा व सत्तरी मतदारसंघातून चार वेळा विधानसभा निवडणूक लढवून राणे सतत अकरा वेळा निवडून आले. गोव्याच्या राजकारणात सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा इतिहास राणेंनी घडविला.

विशेष म्हणजे ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. राजकारणात एक निष्कलंक नेता, उत्तम प्रशासक, दूरदृष्टी असलेला, भ्रष्टाचारविरहीत प्रशासन देणारा, शिस्त, विकास साधणारा, राज्याच्या हितासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेणारा, सर्वांधिक काळ गोवा विधानसभेत असलेला ज्येष्ठ राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणातील ‘पितामह’ समजले जाणारे प्रतापसिंग राणे यांनी गोव्याच्या राजकारणात पाच वर्षे कायदामंत्री, १५ वर्षे गोव्याचे मुख्यमंत्री, ८ वर्षे सभापती तर ८ वर्षे विरोधी पक्षनेते पदांवर आपली मुद्रा उमटवली. राणे यांनी उच्च शिक्षण घेताना बीबीए ही पदवी संपादन करून कृषी विषयातही पदवी मिळवून कुळण-कारापूर फार्मवर दुग्ध व्यवसाय, भातशेती, पोल्ट्री फार्म हे व्यवसाय १९८२ पासून करत आहेत. आज त्यात त्यांनी वाढ करताना नवीन आंबा तसेच काजू लागवड केली आहे. कृषी व्यवसायात तरुणांनी उतरावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Web Title: Pratap Singh Ranee 11 times the fort of fortune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.