प्रतापसिंग राणेंना जखमी करण्याचे कारस्थान!
By admin | Published: December 28, 2016 01:14 AM2016-12-28T01:14:01+5:302016-12-28T01:18:59+5:30
पणजी : पर्येत काँग्रेसची सभा उधळून विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करण्याचे भाजपच्या
पणजी : पर्येत काँग्रेसची सभा उधळून विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करण्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांचे कारस्थान होते, असा आरोप आमदार विश्वजित राणे यांनी केला आहे.
काँग्रेस हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या बैठकांना मोठ्या प्रमाणावर लोक जमत आहेत हे पाहून भाजपवाले वैफल्यग्रस्त झाले आहेत. सत्तरीतील दोन्ही मतदारसंघ हे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत, हे या पक्षाला खुपत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करण्याचा त्यांचा डाव होता; परंतु प्रतापसिंग राणे हे काही कामानिमित्त त्या बैठकीला येऊ शकले नसल्यामुळे त्यांचा प्रयत्न विफल झाला. त्यामुळे त्यांनी इतरांवर राग काढताना स्टेजवर येऊन हैदोस घातला.
सालेलीत ज्या कुटुंबाच्या सदस्याला ठार मारण्यात आले
होते, त्या वेळी सालेलीवासीयांची
बाजू घेणारा भाजप आज त्या
कुटुंबाच्या सदस्याला उमेदवारी देत आहे, हाही परिर्वतनाचा एक
नमुना असल्याचे ते म्हणाले.
लोकांची या सरकारकडून फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला.