कोळंबी व्यवसायाची स्वप्ने पडली महागात, दोघांची १४ लाख रुपयांसाठी फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 04:52 PM2024-01-31T16:52:58+5:302024-01-31T16:53:23+5:30
निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार जाविध मोनिस (रा.शापोरा) यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.
म्हापसा : काशिराम म्हांबरे कोळंबी पैदास व्यवसाय थाटण्याच्या नावाखाली हणजूण परिसरातील दोघांकडून १४ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी आंध्र प्रदेशातील एका व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार जाविध मोनिस (रा.शापोरा) यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. नोंदवलेल्या तक्रारीनुसार प्रभाकर बीथाला भंगारायन (रा.पूर्व गोदावरी, आंध्र प्रदेश) याच्या विरोधात भागीदारीवर कोळंबी पैदास व्यवसाय थाटण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रार म्हटले आहे.
दरम्यान सदर व्यक्तीने जाविध आणि त्याचा मित्र संतोष भोसले यांच्याशी संपर्क साधून व्यवसायात भागीदारीसाठी प्रस्ताव ठेवून फायद्याची स्वप्न दाखवली. दाखवलेल्या स्वप्नातून दोघांकडून वेळोवेळी रक्कम संशयिताने उकळली. कालांतराने संशयीताकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोघांनी पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयित प्रभाकर बीथाला भंगारायन याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणातील तपास सुरू करताना पोलिसांनी संशयिताचा शोध पोलिसांकडून आरंभण्यात आला आहे.