जनतेसमोर सरकारची कामगिरी मांडा: सदानंद शेट तानावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2024 08:15 AM2024-04-04T08:15:27+5:302024-04-04T08:16:01+5:30

श्रीस्थळ येथे पल्लवी धेंपे यांच्या प्रचारानिमित्त मेळावा.

present the govt performance to the public said sadanand shet tanawade | जनतेसमोर सरकारची कामगिरी मांडा: सदानंद शेट तानावडे 

जनतेसमोर सरकारची कामगिरी मांडा: सदानंद शेट तानावडे 

लोकमत न्यूज नेटवर्क काणकोण: कार्यकर्त्यांनो, निराश होऊ नका. जे भरघोस मताधिक्य मिळेल, त्याचे श्रेय आमदारासह कार्यकर्त्यांनाही लाभेल. सरकारजवळ आम्ही जे काही मागत असतो, ते मागत असतानाच सरकारने आम्हाला काय दिले, ते कार्यकर्ता या नात्याने जनतेसमोर कर्तृत्वाचा लेखाजोखा ठेवायला हवा. पल्लवी धेपे या मडगावच्या कन्या असून, केजी ते पीजीपर्यंतच्या मुलांसाठी त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात कार्य आहे, असे उद्‌गार 'भाजप'चे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काढले.

श्रीस्थळ काणकोण पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार तानावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, भाजप उमेदवार पल्लवी धेपे, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, पक्षाचे सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष बाबू कवळेकर, सचिव सर्वानंद भगत, मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, महेश नाईक, दिवाकर पागी, संजू तिळवे, चंदा देसाई, मनुजा देसाई, विंदा सतरकर, सरपंच आनंदू देसाई, सविता तवडकर, सेजल गावकर, जि. पं. सदस्य शाणू वेळीप, शोभना वेळीप, नगरसेवक गंधेश मडगावकर, अमिता पागी, सारा देसाई, उपनगराध्यक्ष नार्सिस्को फर्नांडिस, सायमन रिबेलो व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी काणकोणचे माजी उपनगराध्यक्ष तथा गोवा शिपयार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष किशोर शेट यांनी भाजपाच्या उमेदवाराला पुष्पगुच्छ देऊन संघटनेचा पाठिंबा जाहीर केला. विशाल देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांना विशाल देसाई, दिवाकर पागी, सजू तिळवे, रजनीश कोमरपंत, गणेश गावकर, सेजल गावकर यांनी पुष्पगुच्छ प्रदान केले.

कार्यक्रमाचे सिद्धार्थ देसाई यांनी सूत्रसंचालन केले. दिवाकर पागी यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांचेही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे भाषण झाले. आतापर्यंत १४ मतदारसंघात उमेदवार पल्लवी यांच्या बैठका झाल्या. पुढील ३४ दिवस कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे. आपले मित्र, नातेवाईक, इतरांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन अॅड. नरेंद्र सावईकर यांनी केले. यावेळी बाबू कवळेकर, सर्वानंद भगत, सेजल गावकर यांचीही भाषणे झाली.

मल्लिकार्जुन देवस्थानला भेट

तत्पूर्वी पल्लवी धेपे यांनी मल्लिकार्जुन देवस्थानला भेट देऊन आशीर्वाद घेतले. देवस्थान समितीचे अध्यक्ष विठोबा देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, दुपारच्या सत्रात गावडोंगरी आणि खोतीगाव पंचायत क्षेत्रांतील कार्यकर्त्यांची बैठक बड्डे येथे रजनीश गावकर यांच्या निवासस्थानी उभारलेल्या मंडपात झाली. तसेच पैंगीण आणि लोलये पंचायत क्षेत्रांतील कार्यकर्त्यांशी पल्लवी यांनी माशे येथील निराकार देवालय सभागृहात आयोजित बैठकीत संवाद साधला.

महिला मल्टी टास्क फोर्स : धेंपे

यावेळी पल्लवी धेपे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात विकासकामे सुरू आहेत. महिलांना ३३ टक्के आरक्षणसुद्धा त्यांनी दिले आहे. महिला ही मल्टी टास्क फोर्स असून, तिचे हात बळकट करायला हवे, असेही त्या म्हणाल्या.

काणकोणवासीय नाही राहणार उपाशी : तवडकर काणकोणची कोणतीही व्यक्ती हताश व निराश होऊ नये, यासाठी आपण कटिबद्ध आहे. २०३०चा काणकोण हा विकसित काणकोण असेल, येत्या तीन वर्षात काणकोणचा एकही नागरिक उपाशीपोटी राहणार नाही, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

 

Web Title: present the govt performance to the public said sadanand shet tanawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.