आवक वाढल्याने मानकुराद आंब्याचे दर उतरले, ४ हजार प्रती डझनवरुन २ हजारावर आले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 05:27 PM2024-04-03T17:27:39+5:302024-04-03T17:28:21+5:30
आंब्याचे दर आणखी खाली येण्याची शक्यता
नारायण गावस, पणजी: राज्यात आता आंब्याची आवक वाढू लागल्याने हळूहळू किमती खाली येत आहेत सुरुवातीला ४ ते ५ हजार प्रती डजनेने विकला जाणारा मानकुराद आंबा आता बाजारात २ हजार रुपये डझनने विकले जात आहेत. तसेच हापूस सुरुवातीला २ हजार रुपये प्रती डझन होता आता ७०० रुपये वर आला आहे. आंब्याचा किमती आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
यंदा आंब्याचा उत्पादन कमी असल्याचे अनेक आंबे उत्पादकांकडून सांगितले जात आहे. तरीही आता मार्केटमध्ये मानकुराद आंबे यायला सुरुवात झाली आहे. तर हापूस आंबे रत्नागिरीहून आयात केेले जात आहेत. फेब्रुवारी मार्चमध्ये याच्या किमती दुपट्ट होत्या त्या आता खाली आल्या आहेत. तसेच आता आणखी खाली येण्याची शक्यता आहे. जसजशी आवक वाढते तशा किमती खाली येत असतात.
राज्यात मानकुराद माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. बहुतांश लाेकांनी मानकुराद आंब्याच्या बागायती केल्या आहेत. पण मानकुरादची यंदा लागवड कमी झाली आहे. त्यामुळे दरही चढे आहेत. गेल्या वर्षी आंब्याची आवक जास्त हाेती. त्यामुळे आंबे १ हजार पर्यंत आले होते. पण अजून आवक वाढली नसल्याने अजून दर चढेच आहे. मानकुराद २ हजार प्रती डझन घेणे तसे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. किमान १ हजारच्या खाली दर असता तर सर्वसामान्य लोकांनी खरेदी केले असते. त्यामुळे लोकांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. एप्रिलच्या १५ नंतर आवक वाढल्यावर मानकुरादचा दर आणखी कमी हाेऊ शकतो, असे आंबे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.