पंतप्रधान गोव्यात; चार प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2024 01:00 PM2024-02-05T13:00:00+5:302024-02-05T13:01:28+5:30

मडगावात जाहीर सभा.

prime minister in goa to inauguration of four project foundation laying of three projects | पंतप्रधान गोव्यात; चार प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधान गोव्यात; चार प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, मंगळवारी ६ रोजी गोवा दौऱ्यावर येत असून, बेतुल येथे 'इंडिया एनर्जी वीक'चे उ‌द्घाटन व मडगाव येथे जाहीर सभा असे त्यांचे दोन कार्यक्रम होणार आहेत. सभेला अवघेच काही तास राहिल्याने सरकारी यंत्रणांची लगीनघाई चालली आहे.

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने मोदी या जाहीर सभेत भाजपसाठी प्रचाराचा नारळ फोडतील. सभेला ५० हजार लोकांची उपस्थिती लाभेल, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले आहे. भाजपचे मंडल अध्यक्ष, आमदार, पदाधिकारी याची जय्यत तयारी करत आहेत.

जाहीर सभेत पंतप्रधानांच्या हस्ते चार सरकारी प्रकल्पांचे उ‌द्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी होईल. यात कुंकळ्ळीत एनआयटी, दोनापावल येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, बेती येथे आयएनएस मांडवी नेव्हल वॉर कॉलेजचे नवीन कॅम्पस आणि कुडचडे कचरा प्रकल्पाचे व्हर्चुअल उ‌द्घाटन याचा समावेश आहे. रेइश मागुश येथे पीपीपी तत्त्वावर रोप-वे प्रकल्प, पाटो - पणजी येथे थ्री डी प्रिंटेड इमारत आणि शेळपे - साळावली येथे १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची व्हर्चुअल पायाभरणी होईल.

रिपोर्ट होणार सादर

या जाहीर सभेवेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गेल्या दहा वर्षातील विकासकामांचा रिपोर्ट पंतप्रधान मोदी यांना देतील. तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांना मोदी यांच्या हस्ते सन्मानित केले जाईल. तत्पूर्वी बेतुल येथे 'इंडिया एनर्जी वीक'चे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल. तीन दिवसीय या परिषदेत १७ देशांचे ऊर्जामंत्री व ३५ हजार प्रतिनिधी सहभागी होतील.

शाळांना सुट्टी, अधिवेशन १० रोजी

सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असून, मोदींच्या सभेमुळे उद्या मंगळवारी कामकाज होणार नाही. त्याऐवजी शनिवारी १० रोजी कामकाज ठेवण्यात आले आहे. जाहीर सभेवेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी उद्या, मंगळवारी मडगाव शहरातील विद्यालयांना शिक्षण खात्याने सुट्टी जाहीर केली आहे. बेतुलसह मडगाव परिसरात कडेकोट बंदोबस्त राहील.
 

Web Title: prime minister in goa to inauguration of four project foundation laying of three projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा