सेरुला घोटाळ्याची पंतप्रधानांकडून दखल
By admin | Published: August 9, 2015 01:00 AM2015-08-09T01:00:06+5:302015-08-09T01:00:32+5:30
पणजी : पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचा कथित सहभाग असलेल्या सेरुला कोमुनिदादमधील जमीन घोटाळ्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
पणजी : पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचा कथित सहभाग असलेल्या सेरुला कोमुनिदादमधील जमीन घोटाळ्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून घेण्यात आली असून या प्रकरणात चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘जनरेशन नेक्स्ट’चे प्रमुख दुर्गादास कामत यांनी या प्रकरणी पंतप्रधानांकडे तक्रार केली होती.
सेरुला घोटाळ्यासंबंधी योग्य कारवाई करण्यात यावी, अशी सूचना करणारे पत्र मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांना पंतप्रधानांच्या कार्यालयातून पाठविण्यात आले आहे. या पत्राची प्रत तक्रारदार दुर्गादास कामत यांना पाठविण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पत्राची त्वरित दखल घेऊन मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी क्राईम ब्रँचला या प्रकरणात तपास करण्याचे निर्देष दिले असून तपास सुरू झाला आहे. आता पंतप्रधानांच्या कार्यालयातून विशेष दखल घेण्यात आल्यामुळे हा विषय प्राधान्यक्रमाने हाताळला जाण्याची शक्यता आहे.
(प्रतिनिधी)