पंतप्रधान मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष गोव्यात
By admin | Published: October 10, 2016 09:14 PM2016-10-10T21:14:48+5:302016-10-10T21:14:48+5:30
गोव्यात ब्रिक्स परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ब्रीक्स परिषदेनिमित्त चीनचे राष्ट्राध्यक्ष जीनपिंग हे गोव्यात दाखल होणार आहेत. गोव्यात सात बुलेटप्रूफ
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.10 - गोव्यात ब्रिक्स परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ब्रीक्स परिषदेनिमित्त चीनचे राष्ट्राध्यक्ष जीनपिंग हे गोव्यात दाखल होणार आहेत. गोव्यात सात बुलेटप्रूफ कारगाडय़ा व देशाच्या विविध भागांतून सुरक्षा रक्षकांच्या एकूण नऊ तुकडय़ा दाखल झाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 रोजी गोव्यात दाखल होत आहेत. त्यासाठी सुरक्षा यंत्रणा सरकारने सज्ज ठेवली आहे. दक्षिण गोव्यातील पंचतारांकित हॉटेलांमध्ये दि. 14 पासून तीन दिवसीय ब्रिक्स परिषद पार पडेल. चीनचे राष्ट्राध्यक्ष जीनपिंग हे 13 रोजी भारताच्या दौ:यावर येत असून ते दि. 13 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत भारतासह कांबोडिया व बांगलादेशचाही दौरा करणार आहेत. गोव्यात येऊन ते ब्रिक्स परिषदेत भाग घेतील.
दरम्यान, अकरा देशांच्या प्रमुखांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी गोवा सरकार सज्ज झाले आहे. साधनसुविधा निर्माणाची कामे आज मंगळवारी पूर्ण होतील. बुधवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे स्थितीचा आढावा घेणार आहेत. सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल असे मिळून एकूण नऊ विविध दलांचे सुरक्षारक्षक गोव्यात दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातूनही दोन तुकडय़ा आलेल्या आहेत. आणखी दोन येणार आहेत. सात बुलेटप्रूफ वाहने गोव्यात अतिशय सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली असून आणखी चार वाहने दिल्लीहून येणार आहेत.