चर्चिलच्या घरावर छापा

By admin | Published: August 12, 2015 01:55 AM2015-08-12T01:55:38+5:302015-08-12T01:55:51+5:30

मडगाव : जैका-लुईस बर्जर लाच प्रकरणात सध्या क्राईम ब्रँचच्या ताब्यात असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या

Print to Churchill's house | चर्चिलच्या घरावर छापा

चर्चिलच्या घरावर छापा

Next

मडगाव : जैका-लुईस बर्जर लाच प्रकरणात सध्या क्राईम ब्रँचच्या ताब्यात असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या वार्का येथील घरावर, तसेच कार्यालयावर मंगळवारी सायंकाळी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत चालू होती. जैका प्रकल्पाची गायब झालेली फाईल आणि या प्रकरणात घेतलेल्या कथित लाचेची रक्कम जप्त करण्यासाठी हा छापा टाकला होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई व निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी ही कारवाई केली. प्रभूदेसाई यांच्या पथकाने आलेमाव यांच्या वार्का येथील घराची, तर कर्पे यांनी आलेमाव यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली. या छापासत्रामुळे आलेमाव यांच्या घरातही काहीसे घबराटीचे वातावरण पसरले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. चर्चिल यांच्या कुटुंबीयांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनाही बोलविण्यात आले. या छाप्यात क्राईम ब्रँचच्या हाती नेमके काय लागले, हे मात्र कळू शकले नाही. आलेमाव हे सध्या क्राईम ब्रँचच्या अटकेत असून त्यांच्या कोठडीचा रिमांड गुरुवार, दि. १३ आॅगस्ट रोजी समाप्त होणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Print to Churchill's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.