उत्तर गोवा अधीक्षकपदावरून प्रियांका कश्यप यांना हटविले
By admin | Published: February 27, 2015 02:11 AM2015-02-27T02:11:22+5:302015-02-27T02:14:13+5:30
पणजी : कळंगुट डान्स बार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकपदावरून प्रियांका कश्यप यांची उचलबांगडी करण्यात
पणजी : कळंगुट डान्स बार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकपदावरून प्रियांका कश्यप यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी अधीक्षक उमेश गावकर यांची वर्णी लावण्यात आली आहे.
कळंगुटमधील डान्स बारचे प्रकरण हाताळण्यात अपयश आल्याबद्दल उत्तर गोवा अधीक्षक कश्यप यांच्यावर सरकार नाराज होते. कळंगुटच्या ग्रामस्थांनी उठाव करून तीन डान्स बारची बेकायदा बांधकामे पाडली. त्यानंतर आमदार मायकल लोबो यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला. त्या निषेधार्थ लोबो यांनी ग्रामस्थांसह एक दिवसाचे उपोषणही केले.
गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यावर त्यांनी आगपाखड केली होती. पोलिसांना आठवड्यातून किमान दोनदा तरी बोलावून घेऊन किनारपट्टीतील गैरव्यवहारांवर कोणती कारवाई केली, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी
घेतली पाहिजे, असे लोबो यांनी म्हटले होते.
यानंतर तीन दिवसांतच कश्यप यांना हटविण्यात आले आहे. त्यांना गावकर यांच्या जागी स्पेशल ब्रँच अधीक्षक म्हणून पाठविण्यात आले असून नियंत्रण कक्ष आणि दहशतवादविरोधी पथकाचा ताबाही त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)