रजेवरील २६ नर्सची पदे कंत्राटी पद्धतीवर भरण्याची प्रक्रिया सुरु; जाहिरात प्रसिद्ध
By पूजा प्रभूगावकर | Published: November 17, 2023 11:45 AM2023-11-17T11:45:42+5:302023-11-17T11:46:56+5:30
रजेवरील २६ नर्सची पदे भरण्यासाठीची जाहिरात गोमेकॉने जाहीर केली आहे.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: रजेवरील २६ नर्सची पदे भरण्याची प्रक्रिया गोमेकॉने सुरु केली आहेत. या सर्व पदांसाठी सोमवार २७ नोव्हेंबर रोजी मुलाखती होतील , असे कळवले आहे.
रजेवरील २६ नर्सची पदे भरण्यासाठीची जाहिरात गोमेकॉने जाहीर केली आहे. सदर पदे ही कंत्राटी पध्दतीने भरली जाणार असून त्यांचा कार्यकाळ हा १८० दिवस ते १ वर्षाचा असेल. या पदांसाठीची वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी असून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यात शिथिलता दिली जाईल.
गोमेकॉत नर्सच्या पदांवर अर्ज करण्याऱ्यांकडे नर्सिंग कोर्स केल्याचे अधिकृत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी सहा महिन्यांचे प्रशिक्षण केल्याचे सहा महिन्यांचे प्रमाणपत्रही अनिवार्य आहे. याशिवाय त्यांच्याकडे मराठीचे ज्ञान असावे. मॅटर्निटी लिव्ह , स्टडी टुअर, केज्युएल लिव्ह आदीवर गेलेल्या नर्सच्या रिक्त पदांवर या इच्छुक उमेदवारांची कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती केली जाईल. त्यांना दरमहा ४० हजार ९०५ इतके वेतन दिले मिळेल. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक ९.३० वाजता गोमेकॉ येथील डीन कार्यालयातील परिषद सभागृहात उपस्थित राहून आपली नाेंदणी करावी. १० नंतर अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही असे या जाहिरातीत नमूद केले आहे.