दृष्टी मरीनतर्फे समुद्रकिनाऱ्यांवर पोहण्यास मज्जाव, खराब हवमानामुळे सूचना जारी
By समीर नाईक | Published: June 25, 2024 03:37 PM2024-06-25T15:37:32+5:302024-06-25T15:37:39+5:30
समुद्रकिनाऱ्यांवर पोहणे बंद करण्याची सुचना दृष्टी तर्फे करण्यात आली आहे.
पणजी: दृष्टी मरीन जीवरक्षक तर्फे पुढील काही दिवसात जोरदार पाऊस आणि हवामान खराब असल्याने समुद्रात धोकादायक प्रवाह, भरती असल्यामुळे समुद्राची स्थिती खराब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर पोहणे बंद करण्याची सुचना दृष्टी तर्फे करण्यात आली आहे.
दृष्टीने केलेले हे आवाहन पावसाळ्यात होणारे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. दृष्टीने केलेले हे आवाहन पावसाळ्यात होणारे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. मान्सून हा जून ते सप्टेंबर पर्यंत चालतो. वाढलेला पाऊस आणि खळवलेला समुद्र अप्रत्याशित हवामान दर्शवितो, ज्यामुळे किनारपट्टीवरील जल-केंद्रित क्रियाकलाप विशेषतः धोकादायक बनतात.
दृष्टी मरीनचे ४५० जीवरक्षक वर्षभर राज्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालीत असतात, पावसाळा प्रतिकूल हवामान, मुसळधार पाऊस आणि उंच लाटांच्या अपेक्षेमुळे समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्यांना पाण्यात पोहायला किंवा फिरायला जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी दृष्टी मरीनच्या देखरेखीखाली सर्व समुद्रकिनाऱ्यांवर लाल झेंडे लावण्यात आले आहे.
पोहणे असुरक्षित असल्याचे संकेत देण्यासाठी आम्ही सर्व किनारे लाल ध्वजांसह चिन्हांकित केले आहेत. अगदी पाण्यात वाहून जाण्यासही सक्त मनाई आहे. समुद्रकिना-यावर तैनात असलेली आमची जीवरक्षकांची टीम हवामानाचे स्वरूप आणि त्यांचा समुद्रावरील प्रभावाचे बारकाईने निरीक्षण करत आहे. त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही बचावकार्य करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
- नवीन अवस्थी , सीईओ, दृष्टी मरीन