प्रस्थापितांची सत्त्वपरीक्षा
By admin | Published: March 10, 2017 02:19 AM2017-03-10T02:19:27+5:302017-03-10T02:21:28+5:30
पणजी : उद्या शनिवारी मतमोजणी होईल व राज्यातील चाळीसही विधानसभा मतदारसंघांचा निकाल लागेल; पण दहा ते बारा प्रस्थापित
पणजी : उद्या शनिवारी मतमोजणी होईल व राज्यातील चाळीसही विधानसभा मतदारसंघांचा निकाल लागेल; पण दहा ते बारा प्रस्थापित उमेदवारांचे नेमके काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच गोमंतकीयांना आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, मंत्री राजेंद्र आर्लेकर, दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, मिलिंद नाईक, माजी मंत्री दीपक ढवळीकर,
माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, चर्चिल आलेमाव, आमदार सुभाष फळदेसाई,
गणेश गावकर यांच्या मतदारसंघातील मतदार कोणता कौल देतात, याकडे
लोकांचे विशेष लक्ष आहे.
या वेळी बहुतेक मतदारसंघांमध्ये निवडणुका अटीतटीच्या ठरल्या. टपाल मतदानाचाही वाद गाजला. कोण जिंकणार व कोण हरणार याबाबतची चर्चा गेला महिनाभर रंगली. उद्या शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला आरंभ होईल व शहरांपासून गावांपर्यंत फटाके फुटू लागतील. विजयाची होळी खेळली जाईल. मात्र, दहा ते बारा मतदारसंघांमध्ये नेमके काय घडेल, नेमका कुणाचा विजय होईल व कुणाचा पराभव होईल, हा प्रश्न लोकांच्या चर्चेमध्ये प्रामुख्याने आहे. निकालास केवळ २४ तास बाकी असल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी १९७७ सालापासून अखंडितपणे विजय प्राप्त केला आहे. ते एकही विधानसभा निवडणूक हरलेले नाहीत. तथापि, यावेळची निवडणूक चुरशीची ठरली आहे. या वेळी अकरावी निवडणूक राणे यांनी लढविलेली आहे. ती त्यांची शेवटची निवडणूक असल्याने निकालाकडे विशेष लक्ष आहे.
मुख्यमंत्री पार्सेकर तसेच मंत्री आर्लेकर यांना अनुक्रमे मांद्रे व पेडणे मतदारसंघात या वेळी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. साळगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंत्री दिलीप परुळेकर यांना गोवा फॉरवर्डचे उमेदवार जयेश साळगावकर यांच्याशी, तर शिवोलीत मंत्री दयानंद मांद्रेकर यांना विनोद पालयेकर यांच्याशी दोन हात करावे लागले. प्रियोळ मतदारसंघात मगोपचे अध्यक्ष उमेदवार दीपक ढवळीकर व अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांच्यात जोरदार टक्कर झालेली आहे. तोच अनुभव मुरगाव मतदारसंघात भाजपचे मिलिंद नाईक व काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांच्यातील लढतीबाबत आला आहे. बाणावलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चर्चिल आलेमाव यांना, तर दाबोळीत भाजपचे उमेदवार माविन गुदिन्हो यांना निवडणूक जड गेलेली आहे. दाबोळीत मगोप विरुद्ध भाजप असा सामना झाला आहे. सांगेत भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई (पान २ वर)