गेस्ट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय; २ दलालांना अटक, ५ युवतींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 08:59 PM2019-08-13T20:59:23+5:302019-08-13T21:00:27+5:30
गेस्ट हाऊस भाड्याने घेवून त्यामध्ये वेश्या व्यवसाय करण्याचा धंदा ओडिसातील काही दलालांकडून करण्यात येत होता.
पणजी: गोव गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कळंगुट येथे छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी ओडिसा राज्यातून गोव्यात आणलेल्या ५ युवतींची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी दोघा दलालांना अटक केली आहे. गेस्ट हाऊस भाड्याने घेऊन त्यातच त्यांनी वेश्या व्यवसाय सुरू केला होता.
गेस्ट हाऊस भाड्याने घेवून त्यामध्ये वेश्या व्यवसाय करण्याचा धंदा ओडिसातील काही दलालांकडून करण्यात येत होता. कळंगुट येथे काही गेस्ट हाऊस खास याच धंद्यासाठी त्यांनी भाड्याने घेतली होती. ग्राहकांना फोनवरून संपर्क झाल्यानंतर त्यांना विशिष्ठ ठिकाणी बोलाविले जात होते आणि तिथे त्यांना युवती सोपविल्या जात होत्या. त्या युवतींना घेऊन त्यांना पत्ता सांगण्यात आलेल्या गेस्ट हाऊसमध्ये ते जात होते.
ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आपलाच माणूस तिथे ग्राहक बनवून पाठविला. त्याला या दलालाकडून एक युवती देण्यात आली आणि गेस्ट हाऊसचा पत्ताही देण्यात आला. तो ज्या गेस्ट हाऊसमध्ये गेला तिथे इतर युवती नव्हत्या. त्या कोणत्या जागी पाठविण्यात आल्या त्याची माहिती पोलिसांनी काढली व त्यांना ताब्यातही घेतले. तसेच दोघा दलालांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांची नावे कान्हा राजू आणि आदर्श अशी आहेत. दोघेही ओडिसामधील आहेत. क्राइम ब्रँचचे अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी ही माहिती दिली.