पी.एस. श्रीधरन पिल्ले गोव्याचे नवे राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 01:14 PM2021-07-06T13:14:54+5:302021-07-06T13:23:48+5:30
राज्यात पूर्णवेळ राज्यपाल नेमावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती.
पणजी : गोव्याच्या राज्यपालपदी पी.एस. श्रीधरन पिल्ले यांची नियुक्ती केली आहे. मिझोरमहून त्यांची गोव्यात बदली करण्यात आली आहे.
गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे होता. राज्यात पूर्णवेळ राज्यपाल नेमावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती.
अन्य राज्यांमध्येही नवे राज्यपाल नियुक्त केले असून कर्नाटकात थावर्डचंद गेहलोत, मिझोरममध्ये हरी बाबू कंभांपती, मध्यप्रदेशमध्ये मंगुभाय पटेल, त्रिपुरात सत्यदेव आर्या आणि हरयानात भंडारु दत्तात्रेय यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.