जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत उत्तर गोव्यात मतदानाविषयी जनजागृती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 04:12 PM2024-04-10T16:12:10+5:302024-04-10T16:15:19+5:30

उत्तर गोवा जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत उत्तर गोव्यात अनेक भागात प्रचार सुर केला आहे.

public awareness about voting in north goa through district election officers | जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत उत्तर गोव्यात मतदानाविषयी जनजागृती  

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत उत्तर गोव्यात मतदानाविषयी जनजागृती  

नारायण गावस, पणजी: जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयकॉनमार्फत गुढीपाडव्यानिमित्त उत्तर गोव्यात ठिकठिकाणी मतदानाविषयी जागृता केली. यावेळी काही ठिकाणी जागृता फेऱ्याही  काढल्या. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे असे आवाहन यावेळी अधिकारी तसेच निवडणूक आयकॉननी केले.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत उत्तर गोव्यात अनेक भागात प्रचार सुर केला आहे. ‘चुनाव का पर्व देश का गर्व’ या बॅनरखाली  हा प्रचार सुरु आहे. या अधिकाऱ्यांप्रमाणे अनेक निवडणूक आयकॉन सहभागी होत आहे. लाेकांनी जास्तीत जास्त घरातून बाहेर येऊन मतदान करावे हा या मागचा मुख्य हेतू आहे. अजूनही लोकांमध्ये मतदानाविषयी जागृता जास्त झालेली नाही. त्यामुळे यंदा ९० टक्के तरी मतदान व्हावे यासाठी हा प्रचार सुरु आहे.

राज्यात पंचायत तसेच विधानसभा निवडणूकीत मतदान जास्त होत असते. पण लाेकसभेत मतदान टक्केवारी खूपच कमी हाेत असते. यंदा असे घडू नये यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. गेले महिनाभर राज्यात जागृता सुरु आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रचार सुरु आहे.  प्रत्येकाला मतदानाचे महत्व पटवून दिले जात आहे. यंदा लोकसभेच्या  निवडणूकीत ९० टक्के मतदान  व्हावे यासाठी हे अधिकारी कर्मचारी झटत आहेत. त्यामुळे नवीन मतदारांपासू्न ज्येष्ठ मतदार सर्वांना या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे.

Web Title: public awareness about voting in north goa through district election officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.