मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची शिमगोत्सवात जनजागृती, चित्ररथ करुन मतदान करण्याचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 05:08 PM2024-03-31T17:08:33+5:302024-03-31T17:08:45+5:30

जास्तीत जास्त लाेक बाहेर येऊन मतदान करावे यासाठी निवडणूक कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

Public awareness of Election Officers for voting in Shimgotsav, message of voting done by making special pictures | मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची शिमगोत्सवात जनजागृती, चित्ररथ करुन मतदान करण्याचा संदेश

मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची शिमगोत्सवात जनजागृती, चित्ररथ करुन मतदान करण्याचा संदेश

नारायण गावस

पणजी: लोकसभेचे निवडणूका जवळ येत असल्याने मुख्य निवडणूक अधिकारी नोडल अधिकारी तसेच निवडणूक आयकॉनकडून माेठ्या प्रमाणात जनजागृता केली जात आहे. शनिवारी पणजीत आयोजित केलेल्या  शिमगोत्सवात या निवडणूक अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन लोकांना मतदान करण्याचा संदेश दिला. यात निवडणूक कार्यालयाने खास चित्ररथ केला होता. माझे मत माझा अधिकार या बॅनरखाली ही जनजागृता सुरु आहे.

जास्तीत जास्त लाेक बाहेर येऊन मतदान करावे यासाठी निवडणूक कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. अनेक नामवंत कलाकार तसेच  निवडणूक आयकॉन म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्याकडू्न महाविद्यायात विविध कार्यालयात तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. जास्तीत जास्त लाेकांनी पुढे येऊन मतदान करावे असा संदेश या जनजागृती मार्फत केले जात आहे.

निवडणूक कार्यालयातर्फे  विविध ठिकाणी स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. तसेच विविध मतदार केंद्रावर  निवडणुकीत ठराविक प्रभाग  विविध आकर्षक केले जात आहे.  काेणीही मतदानापासून वंचित राहू नये  हा या मागचा मुख्य हेतू आहे. ग्रामीण  भागातील काही लोक करायला जात नसल्याने ग्रामीण भागात आता खूप जागृता केली जात आहे. तसेच सर्वांना मतदानाचे महत्व पटवून दिले जात आहे. राज्यात ७ मे ला लोकसभेच्या निवडणूका होणार असल्याने फक्त एक महिना शिल्लक आहे त्यामुळे  अधिकारी १०० टक्के मतदान करुन घेण्यासाठी  धडपडत आहेत.

Web Title: Public awareness of Election Officers for voting in Shimgotsav, message of voting done by making special pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.