२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
By किशोर कुबल | Published: January 10, 2024 01:04 PM2024-01-10T13:04:06+5:302024-01-10T13:06:06+5:30
- सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये राहणार बंद; मुख्यमंत्र्यांकडून जाहीर.
किशोर कुबल, पणजी : येत्या २२ रोजी अयोध्येत होणार असलेल्या श्री राम प्रतिष्ठापनादिनी गोवा सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात सर्व सरकारी कार्यालये, शाळा या दिवशी बंद राहतील.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. सरकारी कर्मचाय्रांनाही प्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
अयोध्येत २२ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर २५ पासून इतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. राम मंदिराच्या या भव्य कार्यक्रमासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील इतर भागांबरोबरच गोव्यातही यामुळे उत्साहाचे वातावरण असून स्थानिक पातळीवरही या दिवशी राज्यात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आहे. अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्वत: उपस्थित राहणार आहेत.