प्रतिमाची शिक्षा ठरणार उद्या

By admin | Published: March 28, 2017 03:03 AM2017-03-28T03:03:41+5:302017-03-28T03:05:50+5:30

मडगाव : सासू व जाऊ यांचा थंड डोक्याने निर्घृण खून करणाऱ्या प्रतिमा नाईकला न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली सोमवारी दोषी

The punishment for the image tomorrow | प्रतिमाची शिक्षा ठरणार उद्या

प्रतिमाची शिक्षा ठरणार उद्या

Next

मडगाव : सासू व जाऊ यांचा थंड डोक्याने निर्घृण खून करणाऱ्या प्रतिमा नाईकला न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली सोमवारी दोषी जाहीर केले. दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्ता यांनी हा निवाडा दिला. बुधवार, दि. २९ मार्च रोजी तिला शिक्षा सुनावली जाईल.
या प्रकरणातील अन्य एक संशयित, माफीचा साक्षीदार बनलेल्या अभिजीत कोरगावकरला न्यायालयाने या खटल्यातून निर्दोष मुक्त केले. मांगूर हिल-वास्को येथील श्री कामत पॅलेस को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील फ्लॅटमध्ये दुहेरी खुनाची ही घटना घडली होती. या सोसायटीतील सिद्धार्थ नामदेव नाईक यांच्या मालकीच्या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये सासू उषा नामदेव नाईक (५८) आणि त्यांची सून नेहा सिद्धार्थ नाईक (२८) यांचा ३० जानेवारी २०१५ रोजी म्हणजे दोन वर्षांपूर्वी खून झाला होता.
(पान २ वर)

Web Title: The punishment for the image tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.