गोव्यात माजी मुख्यमंत्री पार्सेकर बंडाच्या पवित्र्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:46 AM2018-10-21T06:46:05+5:302018-10-21T06:46:19+5:30
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्यावर थेट शरसंधान केल्याने प्रदेश भाजपामधील चिंता वाढू लागली आहे.
पणजी : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्यावर थेट शरसंधान केल्याने प्रदेश भाजपामधील चिंता वाढू लागली आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते असलेल्या पार्सेकर यांनी अघोषित बंड पुकारत प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. मात्र, यामुळे लक्ष्मीकांत पार्सेकरांवर शिस्तभंगाची कारवाईही केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पार्सेकर मुख्यमंत्री होते. म्हणजेच मनोहर पर्रीकर यांच्यानंतर पार्सेकर भाजपाचे सर्वात मोठे नेते ठरले होते. पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेले, तेव्हा त्यांनी पार्सेकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविली होती.