बांधकाम नोकरभरती रद्द होणार नाहीच: मुख्यमंत्री, आलेक्स सिक्वेरा यांना खात्यांचे वाटप आज करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 09:09 AM2023-11-22T09:09:14+5:302023-11-22T09:10:24+5:30
मुंडकार व कुळांच्या व्यथा आणि वेदना मला ठाऊक आहेत. मुंडकारांना न्याय मी देईनच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्यात झालेली नोकर भरती रद्द होणार नाही. ती रद्द करण्याचे कारणच नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल 'लोकमत'ला सांगितले. नवे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासाठी खाते वाटप आज केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नीलेश काब्राल हे सार्वजनिक अंधियारी की भी होने तेवहा मंत्री नोकर भरती झाली ती रद्द करण्याचा विचार आहे काय? असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता, भरती रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भरती प्रक्रिया करताना नियमांच्या चौकटीत राहून केली गेली आहे. त्यामुळे ती रद्द करण्याचे कारण राहत नाही. सार्वजनिक बांधकाम खाते मी माझ्याकडे ठेवावे, अशी इच्छा लोक व्यक्त करतात. योग्य तो निर्णय मी घेईन. आज बुधवारी खात्यांचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंडकारांना त्यांची घरे मिळवून दिली जातील. त्यांच्या नावावर घरे होतील. त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया मी मार्गी लावीन. मुंडकार व कुळांच्या व्यथा आणि वेदना मला ठाऊक आहेत. मुंडकारांना न्याय मी देईनच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोंयकारांची घरे वाचवूया
राज्यातील सर्व कोमुनिदादींच्या जमिनीत बहुतांश घरे ही गोमंतकीयांचीच आहेत. अनेक गोंयकारांनीच कष्टाने घरे बांधली आहेत. त्या घरांचे संरक्षण केले जाईल. काणकोणसह बार्देश तालुक्यातीलही लोक येऊन मला भेटले. हे सगळे गोंयकारच आहेत. त्यांचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य असून मी मुंडकारांना देखील न्याय देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.