स्मार्ट सिटीच्या कामासाठी रायबंदर ते जुने गोवे रस्ता वाहतूकीसाठी बंद
By पूजा प्रभूगावकर | Published: March 11, 2024 01:14 PM2024-03-11T13:14:17+5:302024-03-11T13:14:30+5:30
जुने गोवे हून पणजीला येणाऱ्या खासगी बसेस प्रवाशांना गांधी सर्कल येथून घेऊन वळसा घेत कदंब बायपासमार्गे पणजीला जात आहेत.
पणजी: पणजी स्मार्ट सिटीच्या कामासाठी रायबंदर ते जुने गोवे येथील बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्चा पर्यंतचा रस्ता वाहतूकीसाठी आज सोमवार ११ मार्च पासून दीड महिन्यांसाठी बंद ठेवला आहे. त्यामुळे पणजी ते जुने गोवे दरम्यानच्या कदंब बायपासमार्गे वाहने वळवली जात आहे.
स्मार्ट सिटीच्या कामासाठी रायबंदर ते जुने गोवे दरम्यानचा रस्ता ३० एप्रिल पर्यंत बंद राहील. सदर रस्ता वाहतूकीसाठी बंद असल्याने वाहने कदंब बायपास मार्गे वळवली जात असल्याने सोमवारी सकाळी विशेष करुन चिंबल जंक्शन येथे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होता. त्यामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडी सारखी स्थिती निर्माण झाली होती. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी याठिकाणी वाहतूक पोलिस तैनात केले आहेत.
जुने गोवे हून पणजीला येणाऱ्या खासगी बसेस प्रवाशांना गांधी सर्कल येथून घेऊन वळसा घेत कदंब बायपासमार्गे पणजीला जात आहेत. स्मार्ट सिटीच्या कामासाठी रायबंदर ते जुने गोवे दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी बंद असल्याने बॅरेकेड घालून रस्ता अडवण्यात आला असून तेथेही पोलस तैनात केले आहेत.