रेल्वेमार्ग दुपदरीकरण आंदोलन गोव्यात पेटणार, ख्रिस्तीबहुल भागांमध्ये तीव्र विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:13 AM2020-10-31T04:13:27+5:302020-10-31T04:14:11+5:30
Goa Railway News : एकदा दुपदरीकरण झाले की, गोव्यातून मोठ्या प्रमाणात कर्नाटकात कोळसा वाहतूक होईल व प्रदूषणाचे गंभीर परिणाम गोमंतकीयांना भोगावे लागतील, अशी लोकांची भावना बनली आहे.
पणजी : रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे आंदोलन गोव्यात जोर धरत असून रविवारी १ रोजी रात्री १० वाजता चांदोर-दक्षिण गोवा येथे मोठ्या संख्येने लोक जमून या कामाला विरोध करतील, असा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गोव्यातील सासष्टी तसेच अन्य तालुक्यांमधील ख्रिस्ती बांधवांनी रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला विरोध करीत हा विषय तापवला आहे.
कोळसा वाहतुकीसाठीच रेल्वेमार्ग दुपदरीकरण केले जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. एकदा दुपदरीकरण झाले की, गोव्यातून मोठ्या प्रमाणात कर्नाटकात कोळसा वाहतूक होईल व प्रदूषणाचे गंभीर परिणाम गोमंतकीयांना भोगावे लागतील, अशी लोकांची भावना बनली आहे. येत्या २ रोजी गिर्दोली व चांदोर येथे लेव्हल क्रॉसिंग बंद ठेवून काम केले जाईल तेव्हा मोठा तणाव निर्माण होऊ शकतो.
काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा दिला आहे. कामत म्हणाले की, ‘दक्षिण मध्य रेल मार्गाचे दुपदरीकरण या सर्व प्रकल्पांमुळे लोक संतापलेले आहेत.