राज्यात धुवाधार सुरुच : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:16 PM2024-07-12T14:16:29+5:302024-07-12T14:16:58+5:30

एक दिवस पावसाने विश्रांनी घेतली पण शुक्रवारपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे.

Rain continues in the state Life disrupted by heavy rains  | राज्यात धुवाधार सुरुच : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत 

राज्यात धुवाधार सुरुच : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत 

(नारायण गावस : पणजी गोवा) : शुक्रवारी मुसळधार पावसाने गोव्याला पुन्हा झोडपून काढले, ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोलमडली पडझडीमुळे ठिकठिकाणी वीज गुलही झाली. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. गुरुवारी एक दिवस पावसाने विश्रांनी घेतली पण शुक्रवार पासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे.

 गेल्या रविवारी आणि सोमवारी पावसाने राज्याला झोडपून काढले होते. नंतर दाेन दिवस ओसरला पण आज शुक्रवार सकाळपासून पुन्हा पावसाने झोडपून काढले. त्यामुळे राज्यातील रस्त्यावर पाणी तुंबले होते. मुसळधार पडत असलेल्या पावसाने अनेक  ठिकाणी झाडे पडली  त्यामुळे लाेकांना याचा फटका बसला. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही साफसफाईची कामे करण्यात आली.

: राज्यात ऑरेंज अलर्ट

राज्यात आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून १४ जुलै पर्यंत ऑरेज अलर्ट जारी केला आहे.  तर १५ व १६ जुलै रोजी येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे राज्यात पुढील पाच दिवस जाेरदार पावसाची शक्यता असून वादळी वारे वाहणार आहे. त्यामुळे मच्छिमाऱ्यांना खोल समुद्रात न जाण्याचा  इशारा राज्य हवामान खात्याने दिला आहे.

: नदी धरणांची पातळी वाढली

मुसळधार पडत असलेल्या पावसाने राज्यातील धरणांची पातळी वाढली आहे. साळावली धरण भरले आहे तर अंजूणे धरणही ६० टक्के भरले आहे.  इतर धरणे भरली आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील इतर प्रमुख नद्या व उपनद्यांची पातळी वाढल्याने नद्या शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा आपत्कालीन व्यवस्थापनाने दिला आहे. गेल्या आठवड्यात ५ जणांना मुसळधार पावसाने बळी गेला होता.  तसेच अनेक गुरेही वाहून गेली होती. असे अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाचे  कर्मचारी  तसेच दलाचे जवान  याकडे लक्ष ठेऊन आहेत.

Web Title: Rain continues in the state Life disrupted by heavy rains 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा