राज्यात पाऊस शतकाच्या वाटेवर; पडझडीच्या घटना कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2024 09:44 AM2024-07-20T09:44:52+5:302024-07-20T09:44:59+5:30

आतापर्यंत ९६.९ इंच वृष्टी

rainfall in the state goa falling events persist | राज्यात पाऊस शतकाच्या वाटेवर; पडझडीच्या घटना कायम

राज्यात पाऊस शतकाच्या वाटेवर; पडझडीच्या घटना कायम

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात महिन्याभरापासून पडत असलेला मुसळधार पाऊस शतकाकडे पोहचत आला आहे. १ जून ते १९ जुलैपर्यंत राज्यात ९६.९७ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण हे ५६.९ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या २४ तासांत ४.६ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर वाळपईत सर्वाधिक जास्त ११२.४ इंच पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे राज्यात पडझडीच्या घटनाही वाढत आहेत. काल, शुक्रवारी आमोणे-भंडारवाडा येथे घराची भिंत कोसळली, म्हार्दोळ येथील बागवाडा शिमेपाईण येथे घरावर झाड पडण्याची घटना घडली. डिचोली तालुक्यात पावसाचा जोर चालूच असून मये येथे कुंभारवाडा येथील घरावर वृक्ष पडून चार वाहनांचे घराचे नुकसान झाले. तसेच इतर ठिकाणच्या पडझडीच्या घटनांमध्ये चाळीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात जून महिन्यात ३८ इंच पाऊस झाला तर जुलै महिन्याच्या १९ दिवसांत ५९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात राज्यात ८८६ झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पाऊस सुरु झाल्यापासून पावसाने अजून विश्रांती घेतलेली नाही.

रेड अलर्ट जारी

आज, शनिवारीही हवामान खात्याने राज्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सतत पडत असलेल्या या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे नद्या धरणे सर्व तूडूंब भरली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शेतीबागायतीची हानी झाली आहे.


 

Web Title: rainfall in the state goa falling events persist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.